Download App

राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा? वडेट्टीवारांचा थेट सवाल, शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्यावर…

Vijay Wadettiwar Reaction On NCP Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केलाय. कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण करत आहेत? राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे का? असा सवाल देखील (Suraj Chavan Attack On Vijay Ghadge) त्यांनी केलाय.

कृषिमंत्री अधिवेशनात पत्ते खेळतात

कृषिमंत्री शेतकऱ्यांचा अपमान करतात, अधिवेशनात पत्ते खेळतात, याचा जाब विचारल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारहाण करतात, महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याची मुभा मिळाली आहे का? महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरण समितीचा (Latur News) सदस्य आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाला इतका राग का यावा? मंत्री बेजबाबदार वागत असतील तर प्रश्न विचारायचे नाही का? अशी सोशल मिडिया पोस्ट वडेट्टीवार यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर केली आहे.

छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण, लातूर बंद; सूरज चव्हाण यांचा माफीनामा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेला मारहाण

लातूरमध्ये रविवारी जे घडलं, त्याने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध करत लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राजीनाम्याची मागणी केली. मात्र या मागणीचं उत्तर मारहाणीच्या रूपात मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरण समितीचे सदस्य सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू; वाद, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस; पहलगाम हल्ल्यापासून ‘या’ मुद्द्यांवर गोंधळ होणार

कायद्याची उघडपणे पायमल्ली

या घटनेनंतर संपूर्ण लातूर बंद ठेवण्यात आला. सर्वपक्षीय नेते, संघटना, युवक आक्रमक झाले. छावा संघटनेच्या पाठिंब्याने हा बंद पार पडला. सुरज चव्हाण हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्याची घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते, आणि विरोधी पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सत्तेची मस्ती शेतकऱ्यांची पोरं फोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत छावा संघटनेने इशारा दिला आहे. मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे. सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यभर होत आहे.

 

follow us