Vishnu Chate Directly Confessed About Walmik Karad : बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप होत आहेत. 31 डिसेंबर रोजी कराडने सीआयडीसमोर सरेंडर देखील केलंय. त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याची देखील चौकशी सुरू आहे. विष्णू चाटे हा पोलीस कोठडीत असून नुकतेच त्याने पोलिसांसमोर मोठी कबुली दिलीय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या विष्णू चाटेने (Vishnu Chate) पवनचक्की कंपनीला दोन कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी धक्कादायक खुलासा केलाय. चाटेच्या या कबुलीमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विष्णू चाटेने पोलीस चौकशीत सांगितलंय की, वाल्मिक कराडने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यासोबत फोनवर संभाषण केलं होतं. तर तक्रारीमध्ये देखील विष्णू चाटेच्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केलाय. विष्णू चाटेने याप्रकरणी आता कबुली देखील दिली आहे.
ज्या गाडीतून वाल्मिक कराड ‘CID’ कार्यालयात गेली ती गाडी अजित पवारांच्या… आव्हांडांचा मोठा दावा
त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Beed News) वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणात कराड हाच प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. विष्णू चाटेच्या कबुलीसंदर्भात सीआयडीने न्यायालयात अहवाल देखील सादर केलाय. पोलीस कोठडीत गेल्यानंतर पहिले दोन दिवस कराडने जेवण करण्यास नकार दिला होता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध ही पथकं घेत आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. परंतु आरोपींजवळ मोबाईल नसल्यामुळं त्यांना शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तर या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील विरोधक करत आहे. घटनेमुळे संपूर्ण राज्यात रोष आहे. खासदार अमोल कोल्हे याप्रकरणी बोलताना म्हणाले की, एखाद्या मंत्र्यामुळे या प्रकरणात चौकशीला अडथळा येत असेल तर त्या दृष्टीने योग्य पाऊलं उचचली पाहिते.