Download App

वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा

 Maharashtra Government : राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे.

 Maharashtra Government : राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारी (Wari) दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे. याचबरोबर जर वारकऱ्याला 60 टक्के अपंगत्व आल्यास त्यांना 2.5 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून (Maharashtra Government) देण्यात आली आहे.

आषाढी वारी सुरु असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून या वारीमध्ये लाखो लोक ‘माऊली माऊली’ चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहे. यातच आता राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारकऱ्याचा वारी दरम्यान मृत्यू झाला तर 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर वारी दरम्यान वारकऱ्याला 60 टक्के अपंगत्व आल्यास त्यांना 2.5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Four More Shots Please चा अंतिम सिझन लवकरच प्राइम व्हिडिओवर; पुन्हा होणार ग्लॅमर, ड्रामा आणि मैत्रीचा धमाका

वारकऱ्यासंदर्भात सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार आता वारकऱ्याचा वारी दरम्यान मृत्यृ झाल्यास 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तर 60 पेक्षा कमी अपंगत्व आल्यस 74 हजाराची मदत मिळणार असल्याची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.

‘पोलीस देव नाही’, बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात ‘आरसीबी’च जबाबदार, CAT ची कारवाई 

follow us