Weather Update : राज्यात काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस (Weather Update) होत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात अवकाळी पाऊस होत आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तुफान पाऊस होत आहे. या भागातील अनेक जिल्ह्यांत गारपीट होत आहे. यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता हवामान विभागाने येत्या 48 तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
Weather Update : उन्हाळ्यात अवकाळी अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. हिंगोली, नांदेडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जळगाव, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.
या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या या नुकसानीची तत्काळ माहिती घ्यावी. पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी आता होत आहे. आणखीही काही दिवस पावसाची शक्यता असल्याने अडचणी वाढल्या आहेत. या अवकाळी पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Weather Update : सावधान! पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट