Weather Update : पावसाचा जोर कायम राहणार; आज ‘या’ जिल्ह्यांत तुफान बरसणार

Weather Update : पावसाचा जोर कायम राहणार; आज ‘या’ जिल्ह्यांत तुफान बरसणार

Weather Update : राज्यात काल अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा (Weather Update) जोर आजही कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. या अवकाळी पावसाचा शेतातील पिकांना मात्र चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, काल सायंकाळी नगर शहरात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही वेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. या अवकाळी पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Weather Update : उन्हाळ्यात अवकाळी अन् गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशि आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच देशातही अनेक राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या या नुकसानीची तत्काळ माहिती घ्यावी. पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी आता होत आहे. आणखीही काही दिवस पावसाची शक्यता असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.  हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Rain Alert : सावधान! राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ भागात जोरदार बरसणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube