Download App

‘आम्ही रिझल्ट देण्याचे काम करतो मात्र नकारात्मक प्रचार करणारे…’, जगतापांचा विरोधकांवर हल्लाबोल

Sangram Jagtap : अहमदनगर शहर आता विकास कामातून बदल आहे हे आता नगरकर बोलू लागले आहे. राज्य सरकारकडून नगरच्या विकासासाठी 150

  • Written By: Last Updated:

Sangram Jagtap : अहमदनगर शहर आता विकास कामातून बदल आहे हे आता नगरकर बोलू लागले आहे. राज्य सरकारकडून नगरच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांचे निधी मंजूर करून आणले आहे आणि आता केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड या पहिल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे.

आम्ही शहराला विकासाच्या कामातून रिझल्ट देण्याचे काम करत आहे. शहरात कोणाच्या काळात किती काम झाले आहे याची कोणाला माहिती मागायची असेल तर त्यांनी मागणी मागावी त्यामध्ये आमचं नाव सर्वात वरती असणार असं आज आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सांगतिले.

जगताप आज केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोडपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाच्या शुभारंभावेळी बोलत होते. यापूर्वी भौगोलिक दृष्ट्या शहराच्या विकासाचे नियोजन झाले नव्हते. काही लोक निवडणूक आली की एकत्र येतात आणि शहर मागे राहिले, भकास झाले अशी टीका करत असतात मात्र निवडणुक झाल्यानंतर ते लोकही सापडत नाही. त्यांच्या फक्त छुपा एजेंडा निवडणुकी पुरताच असतो. असं देखील यावेळी संग्राम जगताप म्हणाले.

तसेच पहिल्या टप्प्यातील सिना नदीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू होणार असून आपल्या पर्यावरणावर देखील काम करावे लागणार आहे असेही यावेळी संग्राम जगताप म्हणाले.

‘पवार इस द पावर, नाद करू नका अन्यथा…’, लंकेंचा थेट राम शिंदेंना इशारा

पुढे बोलताना संग्राम जगताप म्हणाले की, राज्य सरकारचा जीएसटी आणि महापालिकेचा कर रुपी टॅक्स केडगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक भरत असतात मात्र तरीही देखील या परिसरात विकास कामे झाले नाही मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वीच ही विकास कामे मंजूर झाली होती. काही लोकांनी या कामांमध्ये खोडा घातल्यामुळे ती होऊ शकली नाही आता या परिसरातील बहुतांश रस्त्याची कामे मार्गी लागणार आहे. असेही यावेळी संग्राम जगताप म्हणाले.

follow us