‘पवार इस द पावर, नाद करू नका अन्यथा…’, लंकेंचा थेट राम शिंदेंना इशारा

‘पवार इस द पावर, नाद करू नका अन्यथा…’, लंकेंचा थेट राम शिंदेंना इशारा

Nilesh Lanke On Ram Shinde : कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वतीने आज मिरजगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा भव्य नागरी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नाव न घेता आमदार राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, मागच्या वेळी रोहित पवार यांना 44 हजारांचा लीड होता मात्र आता काळजी करू नका माझ्यावर जबाबदारी आहे. काही उलट पालटं होईल असा कोणाचा भ्रम असेल तर असं काही होणार नाही. यावेळी एका लाखापेक्षा जास्त लीडने रोहित पवार विजय होणार. या मतदारसंघात त्यांचा काम आहे. रोहित पवार यांच्याकडे व्हिजन आहे. असं खासदार निलेश लंके म्हणाले.

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, मी नेहमी सांगतो की कुणाचाही नाद करावा पण पवारांचा नाद कुणी करू नये. जर कर्जत – जामखेडमध्ये देखील कोणाच्या डोक्यात काही असेल तर त्यांनाही सांगतो, एवढेच नव्हे तर हात जोडून विनंती करून सांगतोय, नाद करा पण पवारांचा नाद करू नका अन्यथा राजकीय नुकसान तुम्ही करून घ्याल. असं म्हणत खासदार निलेश लंके यांनी राम शिंदे (Ram Shinde) यांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिला. ‘पवार इस द पावर अँड पावर इस द पवार’ असं देखील यावेळी लंके म्हणाले.

पुढे बोलताना खासदार लंके म्हणाले की, आज या मतदारसंघात रोहित पवार यांनी बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आज राज्यात सर्वात जास्त डिजीटल शाळा या मतदारसंघात आहे.

कोण आहे ही ‘माया’, जी सांभाळणार TATA ग्रुपची जबाबदारी?

राज्यातील हा एकमेव तालुका असेल जिथे तीन तीन उपजिल्हा रुग्णालाय आहे. ग्राऊंड लेवलला राहून काम करणारा माणूस म्हणजे रोहित पवार आहे. आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात सर्वात जास्त निधी आणण्याचं काम केलं. असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube