राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Weather Update

Weather Update

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचं आगमन होऊन पाऊस पडायला (Maharashtra Rain Update) सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोरही कमी झाला आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. आताही भारतीय हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार आज राज्यातील ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस (Weather Update) होऊ शकतो. विदर्भात अनेक ठिकाणी आगामी तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, नगर, धाराशिव, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र नागरिकांना चांगली बातमी मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने मागील आठवड्यात एन्ट्री घेतली. चार ते पाच दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरणात बदल झाला होता. राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे. परंतु दोन दिवसांपासून पावसाचा जोर थोडा कमी झाल्याचे दिसत आहे.

राज्यात मान्सूनची दमदार आगेकूच! पुढील 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये (Monsoon) दाखल झाला आहे. यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात (Rain Alert) झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागला आहे. रेमल वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यांत जोरदार पाऊस पडला होता.

Exit mobile version