Baba Adhav :महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन अहमदनगर येथे सुरू आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात बोलताना ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांनी भाजपमधील नेते हे माथाडी कायद्याला विरोध करत असल्याचा सांगताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर तोफ डागली.
NCP मोठा भाऊ; अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांचं चॅलेंज, सगळ्यांची DNA टेस्ट करू….
ते म्हणाले, माथाडी कायदा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु काही जण त्याला विरोध करत आहेत. त्यात मंत्री विखे पाटील आहेत. विखेंच्या आजोबांनी कामगारांसाठी श्रीरामपूरला साखर कामगार हॉस्पिटल काढण्यासाठी मदत केली आहे. तुम्ही तुमच्या आजोबांचा आदर्श घेऊन तरी माथाडी कायद्याला विरोध करू नका. विखेंनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, निलंगेकरांनीही या कायद्याला विरोध करून मोठा प्रताप केला आहे. या लोकांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या सासवांना आनंदाच्या उकळ्या फुटतात, असाही टोलाही बाबा आढावा यांनी लगावला आहे.
Prakash Ambedkar : सरकारला ‘ही’ भीती वाटत असल्यानं दोन हजारच्या नोटबंदीचा निर्णय
हा कायदा करायचा म्हटले तर फडणवीसांचा थयथयाट होत असल्याचा आरोपही आढाव यांनी केला आहे. हा कायदा होऊ नये म्हणून थेट दिल्लीला पत्रव्यवहार होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी यात लक्ष घालून दिल्लीतील खासदारांना हा कायदा करण्यासाठी सांगितले पाहिजे, असे आवाहन बाबा आढावा यांनी केले आहे.
सध्या लोकशाही धोक्यात आलेली आहे. आम्ही भारताचे लोक ही केवळ प्रतिज्ञा राहिली आहे. काही लोकांना लोकशाहीतील समाजवाद मान्य नाहीत. त्यामुळे घटनेने राज्य चालविण्यासाठीचा लढाही साधा नाही, असे आढाव म्हणाले.