Download App

टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात! फुकट्या प्रवाशानं दगडाने डोकं फोडलं…

टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात पडलं आहे. एका फुकट्या प्रवाशाला तिकीट विचारताच त्याने टीसीचे दगडाने डोकं फोडल्याची घटना घडली. रेल्वेत प्रवास करत असलेल्या एका फुकट्या प्रवाशाला तिकीटाची विचारणा करताच त्याने तिकीट निरीक्षकाचे (टीसीचे) दगडाने डोकं फोडलं आहे. ही घटना दौंड कॉर्ड लाईन मार्गावर घडली असून या प्रकरणी अहमदनगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी तापसी पन्नूने तयार केला NFT फॅन्स क्लब

नेमकं काय घडलं?
काल दि. 20 जुलै रोजी तिकीट निरीक्षक धर्मवीर कुमार सुबुकलाल पुणे-नांदेड एक्सप्रेस रेल्वे गाडीत प्रवाशांचे तिकीट तपासत होते. याचदरम्यान, एसी डब्यात बसलेल्या इसमाला तिकीटाची विचारणा केली असता त्याने मी रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिकीट निरीक्षकांनी त्याला ओळखपत्राची मागणी करताच सदरील इसमाने हुज्जत घालून वाद घातला.

मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…

दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की, या प्रवाशाने रेल्वेच्या खाली उतरुन तिकीट निरीक्षकाच्या डोक्यात दगड मारला. दगड मारल्यानंतर सदरील प्रवाशाने धूम ठोकली. दरम्यान, घटना घडल्यानंतर तिकीट निरीक्षकावर तत्काळ प्रथमोपचार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…

दरम्यान, प्रवाशाने दगड मारल्याने तिकीट निरीक्षकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून 8 टाके पडले आहेत. या प्रकरणी अहमदनगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून फुकट्या प्रवाशाचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणानंतर तिकीट निरीक्षक सुबुकलाल यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे.

Tags

follow us