चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी तापसी पन्नूने तयार केला NFT फॅन्स क्लब

चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी तापसी पन्नूने तयार केला NFT फॅन्स क्लब

Taapsee Pannu : ‘बेबी’, ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ यांसारख्या अनेक हीट चित्रपटांत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) भूमिका साकारल्या. तापसीने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं. तापसी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. तिची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. चाहत्यांना तापसीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर तापसीला चाहते अनेक प्रश्न विचारत असतात. दरम्यान, आता तापसीने नुकतेच तिचे “taapseeclub.com” नावाचे स्वतःचे NFT प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. (Taapsee Pannu launches her NFT platform the actress will directly connect with fans)

या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी अधिक सखोल जाणून घेण्याची आणि तिच्याशी जवळचं नातं निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. NFTs लाँच करण्याचा उद्देश हा जगभरातील तापसीच्या चाहत्यांसाठी एक उत्तम आणि सकारात्मक व्यासपीठ तयार करणं हा आहे. या प्लॅटफॉर्ममुळं तापसीच्या आयुष्याची झलक चाहत्यांना अनुभवता येणार आहे. जो चाहता या प्लॅटफॉर्मचा सदस्य बनतो त्याला तापसीच्या चित्रपटांच्या सेटवर हजर राहण्याची, तासपीसोबत खास प्रसंग साजरे करण्याची, आणि तिच्याशी संभाषण करण्याची संधी मिळेल. हा प्लॅटफॉर्म चेहरा नसलेल्या ट्रोलर्सना खऱ्याखुऱ्या चाहत्यांपासून वेगळं करेल, असा विश्वास तापसीला आहे.

मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी… 

शिवाय, या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आधीच एका खास कार्यक्रमाची योजना तयार केली आहे. ज्यात आरजे आणि अभिनेता अभिलाष थपलियाल यांच्यासह अबीश मॅथ्यू, अंगद रन्याल आणि गुरलीन पन्नू सारखे प्रसिद्ध विनोदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम खरोखरच लक्षात ठेवण्यासारखा होणार असल्याचं तापसीनं सांगितलं.

https://www.instagram.com/reel/Cu8sbY9oZzo/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

सिने अभिनेत्याचं-अभिनेत्रीचं आयुष्य हे एखाद्या कोड्यासारखं असतं. त्यांच्याविषयी लोकांना कमालीचं कुतूहुल असतं. त्यामुळं चंदेरी दुनियेतील लोकांविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा असते. त्यामुळं तापसीचा हा प्लॅफॉर्म तिच्या चाहत्यांसाठी तिच्याविषयी जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग ठरेल. त्याबद्दल बोलताना तापसी म्हणाली, हा प्लॅटफॉर्म निनावी ट्रोलर्सना खऱ्या चाहत्यांपासून वेगळे करण्यात मदत करतो. म्हणूनच, मी केवळ खऱ्याखुऱ्या चाहत्यांसाठी NFT लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्ममुळं त्यांना मला अधिक वैयक्तिकरित्या जाणून घेण्याची संधी मिळेल. माझ्याशी थेट कनेक्ट होता येईल. मला माझ्या NFT सदस्यांसाठी एक अनोखा अनुभूती द्यायची आहे. हा अनुभव माझ्या सार्वजनिक जीवनापेक्षा फार वेगळा असेल. इथं चाहते मला कनेक्ट होऊ शकतात. आणि मलाही माझे मन मोकळे करायला आणि लोकांशी संवाद करायला आवडते आणि मला वाटते की तुमच्या भावना व्यक्त करताना सोशल मीडिया फार घातक आहे. त्यामुळं आपलं हित पाहणाऱ्या, आणि आपल्या वाढीस हातभार लावणाऱ्या जवळच्या लोकांचा समुदाय असणे नेहमीच फायदेशीर असते, असंही तापसी म्हणाली.

तापसीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तापसी सध्या अनेक चित्रपटांच्या शुटमध्ये वस्त आहे. लवकरच तापसी शाहरुख खानसोबतच्या ‘डंकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘वो लड़की है कहाँ?’ या चित्रपटांमध्येही तापसी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube