Download App

कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का; ए वाय पाटलांचा शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा

Ajit Pawar Groups A Y Patil support to Shahu Maharaj : कोल्हापूरमध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) गटाला धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील ( A Y Patil ) यांनी कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा येथे जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी मुलगा व मुलीवरील प्रेमामुळेच फुटली; अमित शाहांचा पुन्हा ठाकरे, पवारांवर निशाणा

जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केल्यानंतरही ए वाय पाटलांची नाराजी कायम असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. त्या दरम्यान त्यांनी आता थेट कार्यकर्त्यांसहित नवीन राजवाडा येथे जाऊन महायुतीचा उमेदवार असतानाही महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी दोन ते अडीच हजार कार्यकर्त्यांसोबत हा पाठिंबा जाहिर केला.

इंडिया आघाडी कुणी दिल्लीकडे कुणी बारामतीकडे खेचतय, ती विना डब्ब्यांची ट्रेन; फडणवीसांचा टोला

हा पाठिंबा दण्यावर ए वाय पाटलांनी सांगितलं की, संविधान बचावा साठी आणि देशात हुकूमशाही उद्याच्या काळात लागू होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्या नेतृत्वावर नाराज असलेल्या ए वाय पाटील यांची लोकसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट झाली आहे. तसेच यावेळी त्यांनी मी राष्ट्रवादी सोडलेली नाही. केवळ लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा देत असल्याचाही पाटील यांनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे ए वाय पाटील हे खास मित्र देखील आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणाऱ्या बद्दल जिल्ह्यात उत्सुकता होती. महायुती आणि भाजपमधील अनेक नेत्यांनी त्यांना महायुतीमध्ये सक्रिय होण्याची विनंती देखील केली होती. मात्र अखेर पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा जाहीर केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज