स्वाभिमानी असता तर सत्तेच्या बाहेर पडला असता; दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पुन्हा वाद पेटला !

Rohit Pawar : मला जे समजते, ज्यांनी काही स्टेटमेंट दिलेले आहे. कदाचित ते माझ्याबद्दल नव्हतं. पण पवार कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मी रोहित पवार आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rohit Pawar

Rohit Pawar On sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघात मृत्यूप्रकरणाच्या चौकशीवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) वाद पेटला आहे. काल खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने खंत व्यक्त केली होती. त्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली होती. या दोघांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ( sunetra Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले होते. अजितदादांच्या अपघातावरन राजकारण करू नका, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले होते. त्याला आता रोहित पवारांनी उत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणाले, मला जे समजते, ज्यांनी काही स्टेटमेंट दिलेले आहे. कदाचित ते माझ्याबद्दल नव्हतं. पण पवार कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मी रोहित पवार आहे. मी त्याच परिवारामध्ये जन्मलेलो आहे. जन्मापासून माझे आडनाव पवार आहे. जे गेले आहेत, ते माझे काका आहेत. एक पुतण्या त्या काकाला न्याय मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे. ते माझा काका होते, माझे नेतेही होते. त्यांचा मी कार्यकर्ता आहे. राज्याचा नागरिक म्हणून मोठा नेता जेव्हा कुठल्याही कुठल्या कारणामुळे त्यांचा मृत्यू होतो. तपास चांगला पद्धतीने व्हावा, यासाठी या महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. दुर्देवाने असे होत नाही, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.


पुण्यात DJ वरून धंगेकर-बापट आमनेसामने; सणांवर बंदी आणणार का? तुम्हाला क्रांती घडवायची असेल तर…

सरकारमधील सर्व नेते, जे दादांना मित्र समजायचे, ते अजूनपर्यंत दादांना न्याय देऊ शकले नाहीत. मग आम्ही त्यासाठी प्राणामिक प्रयत्न करत असेल, कुणाला तो प्रयत्न योग्य वाटत नसेल, ते विषय सगळे तुम्हाला लखलाभ. आम्ही आमच्या पद्धतीने लढत राहणार आहोत. आम्ही मराठी माणसं आहोत. आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत. जे कोणी सत्तेत असतील, सत्तेचा योग्य वापर केला पाहिजे. विकास दुसऱ्याला लेव्हलला ठेवा. पहिले नेत्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा. राहिला प्रश्न विरोधातील प्रश्न आहे. आम्ही लढत राहू. जे मला योग्य वाटतं, असेल ते मी करत करत असतो. उद्या जावून मी कुणाचे एेकत नसतो. एकदा ठरविले तर मी कुणाचे एेकणार नाही.


शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार! कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने

सुप्रिया सुळे या योग्य बोलल्या आहेत. अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर मुंबई, सीआयडीला, बारामतीला दाखल झाला नाही. कर्नाटकाला जावून एफआयआर होत असेल, तर लाज वाटली पाहिजे, या सरकारला. सरकारमधील सर्व पक्षांच्या नेत्यांना आणि प्रशासनाला सुद्धा. दादांवर अन्याय झाला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


तुम्हाला स्मरणपत्र द्यावे लागले-रोहित पवार

भाजपबरोबर असलेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष असो की अजितदादांचा पक्ष असू द्या. अजितदादांच्या पक्षातील चाळीस आमदारांनी विनंती केली, सीबीआयकडे तपास द्या. तुम्हाला स्मरणपत्र द्यावे लागले आहे. विकासासाठी भाजपबरोबर गेले आहात. नेत्यावर अन्याय झाला आहे. त्यांचा मृत्यू झालाय. त्याचा तपासासाठी स्मरणपत्र द्यावे लागले. केराची टोपली दिलीय. स्वाभिमानी काही लोक असती तर लगेच सत्तेच्या बाहेर गेले असते. शेवटी स्वाभिमान सगळ्यानाच मिळतो असे नसते. स्वाभिमानी टिकविण्याची जबाबदारी ज्या लोकांवर असतो. त्यांना संघर्ष करावा लागतो. संघर्ष करण्याची भूमिका आहे, ते आता विरोधात आहे. आम्ही लढतो आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

follow us