Siddaramaiah’s Baramati Tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आज बारामती (Baramati) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आले होते. यावेळी सिद्धरामय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना कर्नाटकच्या योजना महाराष्ट्रात लागू करण्याची विनंती केली. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येताच प्रचारादरम्यान दिलेली पाच आश्वासने सिद्धरामय्या सरकारने 24 तासांत पूर्ण केली होती.
सिद्धरामय्या म्हणाले की कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर निवडणूक काळात दिलेली पाच आश्वासने अवघ्या 24 तासांत पूर्ण केली. सर्व महिलांना बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे. आता कुटुंब प्रमुख महिलांना प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये 15 ऑगस्टपासून मिळणार आहेत. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात सरकार येईल. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने या योजना लागू कराव्यात अशी विनंती मी अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे करतो. या योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला करुन द्यावा, अशी विनंती करतो, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले.
लाचखोर रामोडची बदली रोखण्यासाठी विखेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अंबादास दानवेंनी पुरावाच दाखविला !
दरम्यान, काँग्रेसने निवडणुकीत कर्नाटकमधील कुटुंबाला 200 युनिट पर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला 2000 रुपये मासिक मदत, दारिद्ररेषेखालील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा 10 किलो तांदूळ अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील प्रत्येक पदवीधर बेरोजगारांना दोन वर्षांसाठी दरमहा 3000 हजार रुपये आणि पदवीधारकाला 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. कर्नाटकमध्ये काँग्रेसला धूळ चारत 136 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले होते. शपथविधी झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या घोषणाची पूर्तता केली होती.