Download App

खळबळजनक! अहमदनगरमध्ये घरात साडपला लष्करी दारूगोळा, आरोपीला अटक

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील एका व्यक्तीच्या घरात भारतीय सैन्यात वापरला जाणार लष्करी दारूगोळा आणि स्फोटके सापडली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे येथल सदन कमान मिलिटरी इंटेलिजन्स यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडून दारूगोळा आणि स्फोटकांचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. दिनकर त्रिंबक शेळके (Dinkar Trimbak Shelke) (वय 65, रा. खारे कर्जुने) असे आरोपीचे नाव आहे. (Army ammunition explosive stockpile found in a persons house in Ahmednagar)

खारे कर्जुने परिसरात लष्कराचे महत्त्वाचे मोठे पायदळ प्रशिक्षण केंद्र आहे. तसंच या ठिकाणी वर्षभर युद्ध सरावही चालतो. या निमित्ताने लष्कराचा हा संपूर्ण भाग केवळ सामान्य नागरिकांना प्रतिबंधित राहतो. मात्र, काही लोक बेकायदेशीरपणे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करतात आणि सरावांमध्ये गोळीबार केलेल्या तोफगोळ्यांतून बर्‍याचदा स्फोट न झालेले बॉम्ब, दारूगोळा घेऊन जातात.

भारताचा आशियात डंका, आता नेपाळप्रमाणे श्रीलंकेतही रुपया खळखळणार 

दिनकर शेळके यांनी आपल्या घरी भारतीय लष्करात वापरलेला दारूगोळा व स्फोटके बेकायदेशीररीत्या ठेवली आहेत. आता जाऊन शोध घेतला तर हा स्पोटकांचा साठा मिळू शकेल अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने, पुणे येथील सदन कमान मिलिटरी इंटेलिजन्स, दहशतवाद विरोधी शाखा, बीडीडीएस अहमदनगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी शेळके याच्या खारे कर्जुन येथील घरी जाऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा शेळके याने सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असतामोठ्या प्रमाणात जिवंत, मृत बॉंब आढळले.

पथकाने दिनकर शेळके याला ताब्यात घेऊन पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला दारूगोळा व स्फोटके जप्त केली. यामध्ये 18 टँक राउंड, 5 मोटार राउंड, 8 अॅम्युनेशन पिस्टल राउंड, 16 पिस्टल राऊंड, 40 स्विचेस, लाल पिवळ्या वायर बंडल आणि 25 किलो टीएनटी पावडरचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ कायदा कलम 4 आणि भारतीय शस्त्र कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही स्फोटके तो कोणाला विकणार होता? पुढे ते कशासाठी वापरले जाणार होते? त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Tags

follow us