Download App

Sujay Vikhe Patil; भिंगार छावणीचा सहा महिन्यात महापालिकेत होणार समावेश

Bhingar Camp : के. के.रेंजसाठी (K. K. Range) होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा.सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच भिंगार छावणी (Bhingar Camp) परीसराचा सहा महिन्यात महापालिकेत समावेश होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यां समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

खा. सुजय विखे पाटील यांनी बैठकीत के.के.रेंजचा प्रश्न प्राधान्याने मांडून शेतकऱ्यांच्या जमीनीचे अधिग्रहण करण्यास राज्य सरकारच्या महसूल विभागाने असमर्थता दर्शवली आहे. या बैठकीला केंद्राचे संरक्षण सचिव गिरीधर असमाने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला खा.डॉ सुजय विखे पाटील, नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे उपस्थित होते.

राज्य सरकारच जमीनीचे अधिग्रहण करण्यास असमर्थता दर्शवित असल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे विखे पाटील म्हणाले.

नगर-आष्टी रेल्वेला लागलेली आग आता संशयाच्या भोवऱ्यात, थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार

अहमदनगर भिंगार काॅन्टाॅमेंट परीषदेचा समावेश आता नगर महापालीका हद्दीत होण्याच्या दृष्टीने तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर पुढील सहा महिन्यात छावणी परिषदेचा समावेश महानगरपालिकेत होणार असल्याने भिंगार मधील एफएसआय व बांधकामाचा येणाऱ्या अडचणीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल.

अहमदनगर शहरातील छावणी परिषद जागेवर वसलेल्या रामवाडी, गोकुळवाडी, कॅम्प कौलारू, कोठला या झोपडपट्ट्यांच्या जागेच्या बदल्यात राज्य सरकार लष्कराला दुसऱ्या ठिकाणी जागा देणार आहे. या झोपडपट्ट्यांची जागा राज्य शासनाला लष्कराकडून मिळेल यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य मिळाले. या भागाचा थांबलेला पायाभूत विकास राज्यशासन मार्फत व महानगरपालिके मार्फत होण्याचा मार्ग आता मोकळा होणार असल्याचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सांगितले.

प्राजक्त तनपुरे आक्रमक; सरकारला जागे करण्यासाठी घालणार ‘जागरण गोंधळ’

नगर जिल्ह्यातील या महत्वपूर्ण निणर्यासाठी राज्य सरकारचे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. नागरिकांची मागणी पूर्ण करणार असल्याचे समाधान खा.विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Tags

follow us

वेब स्टोरीज