Download App

Chhagan Bhujbal : मनोज जरांजे पाटील कुणाचं खातोय…; छगन भुजबळांचा थेट सवाल

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) जाहीर सभा घेतली. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध करणाऱ्या मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) जोरदार टीका केली. गोरगरीब मराठा जनतेनं तुम्हाला मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमाला. जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले, ते आम्हाला शिकवतात, अशा शब्दात त्यांनी भुजबळांचा समाचार घेतला. याला आता भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Navratri Garbo Song: पीएम मोदींच्या गाण्यावर होणार गरबा! सोशल मीडियावर व्हिडिओ प्रदर्शित 

आज माध्यमांशी बोलतांना भुजबळांना जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले, मी मनोज जरांगेंचं काय खाल्लं हे त्यांनी सांगावं. आता जरांगे कुणाचं खातोय? आधी जरागेंची काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, मी ना आरक्षणात शिकलो. ना माझी मुलं आक्षणात शिकली. ओबीसी आरक्षण आम्ही घेतलं नाही, अशी स्पष्टोक्ती भुजबळांनी दिली.

भुजबळ मराठा समाजात फुट पाडतील, असा आरोप जरांगेंनी केला. यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, माझ्या राजकीय कारकीर्दित मी अनेक मराठा नेत्यांसोबत काम केलं. माझंही काही तरी योगदान आहे. मला मात्र, आज मराठ्यांनी मोठं केलं असं सांगत शिव्या दिल्या जात आहे. मराठा समाज एवढा नादान, अशिक्षित किंवा असंस्कृत नाही, की माझ्या बोलण्यामुळं मराठा समाजात फुट पडेल. जरांगे हे त्यांच्या संस्कारानुसार बोलतात. हे अचानक पुढारी झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विजय वडेट्टीवार या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की, मराठा समाजाला आरक्षण द्या. पण, इतरांच्या आरणालाही धक्का न लावता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आमचा पाठींबा मराठा समाजाच्या आरक्षणाला आहे. मात्र, ते देतांना इतराच्या आरक्षणाला धक्का लावू नये. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणार आरक्षण द्यावं, असं भुजबळ म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=6LHAcWXiT34

छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.मराठा आरक्षणाच्या आड याला तर तू जिवंत राहणार नाही, अशी धमकी त्यांना देण्यात आली. यावर बोलतांना ते म्हणाले की, मी अशा धमक्यांना मुळीच घाबरत नाही. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाहीच. फक्त ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये, ही माझी भूमिका आहे. माझा समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असंही भुजबळ म्हणाले.

Tags

follow us