Download App

खबरदार! तरुणींची छेड काढाल तर… दंडुका घेऊन दामिनी पथक सज्ज, टवाळखोरांची मस्ती जिरणार

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थींनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच शालेय परिसरात किरकोळ वादातून मोठ्या घटना देखील घडू लागल्या आहेत. या गोष्टींना आळा बसावा यासाठी व रोडरोमिओ तसेच टवाळखोरांना वचक बसावा यासाठी आता दामिनी पथक रस्त्यावर उतरले आहे. नगर शहरातील न्यू आर्टस् कॉलेज (New Arts College) परिसरात या दामिनी पथकाने (Damini Squad) धडाकेबाज कारवाई केली आहे. (Damini Squad redy safety for women and girls in ahmedngar)

काही दिवसांपूर्वी नगर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या न्यू आर्ट्स कॉलेज परिसरात एकावर प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणूनच आता शहरातील कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध पोलिस दल चांगलेच आक्रमक झाले आहे. भरोसा व निर्भया सेलच्या पथकाने शुक्रवारी 68 टवाळखोर मुलांवर कारवाई केली आहे. याशिवाय 15 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 11 हजार 500 रुपयांचा दंडवसूल केला आहे.

INDIA VS NDA : मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीची तारीख आणि हॉटेल ठरले 

दरम्यान कारवाई अंतर्गत विना परवाना वाहन चालवणारे, ट्रिपल सिट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच नाव नसतानाही फिरणाऱ्यांविरुद्ध भरोसा व निर्भया पथकाने कारवाई केली आहे. कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने एकूण 3 पथके तयार केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पथकात 3 महिला अंमलदार व 1 पुरुष अंमलदाराचा समावेश आहे. साध्या वेशात राहून पथकाने ही कारवाई केली आहे.

निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार द्या!
शाळा, कॉलेजमध्ये कोणी त्रास दिल्यास संबंधित व्यक्तीची तक्रार निर्भयपणे पोलिसांना द्या, तक्रार आल्यास छेड काढणाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास बदनामी होईल, या भीतीपोटी काही विद्यार्थिनी तक्रार करण्यास असमर्थता दर्शवितात. मात्र आता असे न करता त्रास देणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, तुमचे नाव कोणालाही कळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशी माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक यादव यांनी दिली आहे.

छेड काढणाऱ्यांची या ठिकाणी करा तक्रार
जर कोणी तुमची छेड काढत असले अथवा तुम्हाला त्रास देत असेल तर घाबरवून जाऊ नका. सर्वप्रथम तुम्ही छेड काढणाऱ्यांची बिनधास्त तक्रार द्यावी. तक्रार देता यावी यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एक संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. 7777924603 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही तातडीने तक्रार करावी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Tags

follow us