INDIA VS NDA : मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीची तारीख आणि हॉटेल ठरले
India Alliance meeting in Mumbai : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज तारीख आणि हॉटेल ठरल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, इंडिया गटाची आमची बैठक झाली. पाटना आणि बंगळुरुनंतर आता मुंबईत बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईतील ग्रॅड हयात हॉटेलमध्ये बैठक होणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
ही बैठक 31 ऑगस्टला सुरु होणार आहे आणि 1 सप्टेंबरला पण होईल. 31 तारखेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निमंत्रित लोकांसाठी डिनरचे आयोजन केले आहे. 1 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजता बैठकीला सुरुवात होईल. त्यानंतर ही बैठक 3 वाजेपर्यंत चालणार आहे. पत्रकार परिषद होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
मोठी बातमी : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
मुंबईतील बैठकीचं यजमानपद शिवसेनेकडे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमचे सहकारी आहेत. प्रत्येकाकडे जबाबदाऱ्या आहेत. त्याचे वाटप झाले. ही बैठक देखील पाटना आणि बंगळुरुसारखी यशस्वी होईल, असे संजय राऊत म्हणाले.
31 तारखेला यांच्याकडून आयोजित केलेल्या डिनरला सर्वांना निमंत्रित केले जाणार आहे. इंडियाच्या बैठकीला किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री येतील. या बैठकीसाठी आम्हाला सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला