Ajit Pawar speech in Satara : चांगलं काही घडत असेल तर त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न काही जण करतात. यात त्यांना काय मिळतं हे मला अजूनही कळलेलं नाही. विरोधक काहीतरी टीका करतील पण त्याकडे लक्ष देऊ नका. थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या इतकंच या निमित्ताने सांगतो अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खास आवाहन केलं. सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, आज सरकार सर्वसामान्यांसाठी काम करतंय. त्यांच्यासाठी अनेक योजना आणल्या जात आहेत. महायुतीच्या सरकारने आपली जबाबदारी पार पाडली आहे. सरकारने अनेक महत्वाच्या योजना सुरू केल्या. दुधासाठी अनुदान देण्याचा प्रयत्न केला. वीज माफीसाठी प्रयत्न केला. इतक्या चांगल्या योजना सुरू केल्यानंतरही त्यावर काहीतरी टीका करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.
पिंपरी- चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात 24 जणांचा प्रवेश
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली तर विरोधक म्हणतात भावालाही काहीतरी द्यायचं ना. अरे जेव्हा शेतकरी वीजपंपाचं बटण दाबतो तो देखील आमचा भाऊच असतो ना. की दुसरा कुणी असतो? आम्ही मुलांना जे स्टायपेंड देणार आहोत ते काय आमचे लहान भाऊ नाहीत का..? असे सवाल उपस्थित करत विरोधक काहीतरी टीका करतील पण त्याकडे लक्ष देऊ नका. थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या इतकंच या निमित्ताने सांगतो असे आवाहन अजित पवार यांनी केले.
यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही आपल्या भाषणात विरोधकांवर घणाघाती टीका केली.