कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) हे लाखो भाविकांचं श्रध्दास्थान आहे. मात्र, आता अंबाबाईच्या मूर्तीची (Idols of Ambabai) झालेली झीज हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही वर्षापूर्वी पुरातत्व खात्याकडून मूळ मूर्तीवर नैसर्गिक वज्रलेप आणि रासायनिक संवर्धनही करण्यात आलं होत. मात्र, तरीही मूर्तीची झीज होतचं आहे. दरम्यान, आज कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak Kesarkar) हे कोल्हापुरच्या दौऱ्यावर असून त्यांनी अंबाबाई मंदिर आणि मुर्तीच्या संदर्भात आढवा बैठक बोलावली आहे.
कोल्हापूरच्या मूर्तीची काळाच्या ओघात झीज होण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळं या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी मूर्तीवर नैसर्गिक वज्रलेप देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मूर्तीची झीज होत राहीली. त्यातच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मूर्तीवरच अभिषेक केला जातो. त्यामुळं मूर्तीचे भाग झीजायला लागली. त्यामुळे भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, मूर्तीची झीज झाल्यामुळं राज्य पुरातत्व विभागाकडून 28 फेब्रुवारी रोजी पाहणी करण्यात आल्यानंतर केंद्रीय विभागाला पत्र पाठवण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात जाऊन मूर्तीची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल केंद्रीय पुरातत्व विभाग लवकरच सादर करणार आहे. दरम्यान, हा अहवाल आल्यानंतर संवर्धनाचा पुढील निर्णय होणार असल्याची माहिती कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
मूर्तीची होणारी झीज आणि त्याकडे होणाऱ्या शासनाचं होत असलेलं दुर्लक्ष यामुळं नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मूर्तीचे होत असलेली मोठी झीज, मूर्तीचे निखळत चालले भाग पाहता याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल, दोघांना डच्चू
दरम्यान, आज पालकमंत्री दीपक केसरकर हे कोल्हापुरच्या दौऱ्यावर असून त्यांनी अंबाबाईच्या मूर्तीसंदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सचिवपदावरुन हटवले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांना पदावर पुन्हा घेण्यात यावे, ही मागणी नागरिकांची आहे. नाईकवाडे यांच्या संदर्भात या बैठकीत पालकमंत्री निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत पालकमंत्री हे मंदिर प्रशासन आणि पुरात्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर पालकमंत्री हे मूर्ती संदर्भात निर्णय घेतील. त्यामुळं आता मूर्तीसंवर्धनाबाबत पालकमंत्री काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.