Download App

Devendra Fadnavis: माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावा

मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Constituency) प्रलंबित जलसिंचन व इतर विषयांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज सकाळी बैठक झाली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar), आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) आणि जलसंपदा, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री यांनी पुढील निर्देश दिले.
● नीरा देवघर प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामाला गती द्या.
● कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करा.
● सांगोला उपसा जलसिंचन योजनेचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करा.
● फलटण-पंढरपूर रेल्वे डीपीआरला मान्यता
● फलटण तालुक्यातून विद्युत रोहित्र चोरी जात असल्याचे प्रकार गंभीर असून या संदर्भात कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना निर्देश
● कुकडी लाभक्षेत्रात येणाऱ्या करमाळा उत्तर भागातील गावांना पाणी पोहोचविण्याचे काम पूर्ण करा

माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यावेळी ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी, उद्योग आणि युवकांच्या समस्यांवर चर्चा केली, असे शहाजीबापू म्हणाले. यावेळी सर्व प्रश्न लवकर सोडवले जातील असे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Tags

follow us