Kolhapur News : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा (Kolhapur News)आज शेवटचा दिवस आहे. काही तासांतच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र त्याआधीच कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संताजी घोरपडे रविवारी सायंकाळी प्रचार आटोपून कोल्हापूरकडे परतत असताना मनवाड परिसरात सहा ते सात जणांनी त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी या लोकांनी घोरपडे यांच्यावर हल्ला केला अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.
Video: धनंज महाडिकांची महिलांना भरसभेत धमकी; सतेज पाटलांकडून कोल्हापूरी स्टाईल समाचार
संताजी घोरपडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घोरपडे यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्तस्त्राव झाला. यानंतर हल्ला करणारे लोक जवळच्या शेतात पळून गेले. इतकेच नाही तर त्यांनी घोरपडे यांच्या वाहनांवरही दगडफेक केली. या प्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक प्रचार काळात हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, कुणी केला याची माहिती अजून समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. निवडणुकीचा प्रचार आज थांबणार आहे. त्याआधीच ही घटना घडल्याने करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
अखेर भाजपकडून मित्रपक्षांना न्याय!, आठवले, जानकर, राणा अन् कोरेंना प्रत्येकी 1 जागा