Download App

खासदार मानेंचा ड्रायव्हर आणि आमदारपुत्राच्या ड्रायव्हरची ‘फ्री स्टाइल’ हाणामारी; एकमेंकाचे कपडे फाडले

खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे हे आले होते. दोघांना सोडून ड्रायव्हर वाहने पार्किंग करत होते. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला.

  • Written By: Last Updated:

कोल्हापूर: गाडीला कट मारला म्हणून, गाडी पुढे मागे घेण्यावरून वाद झाला म्हणून मारहाण केल्याचे प्रकार नवीन नाही. सर्वत्र अशा घटना घडत असतात. पण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये अशीच घटना घडली आहे. यात मारहाण करणारे साधे नाहीत. खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane)आणि आमदार प्रकाश आवाडे यांचा पुत्र राहुल आवाडे (Rahul Prakash Awade) या दोघांच्या वाहनचालकांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. दोघांनीही एकमेंकाचे कपडे फाडले, एकमेंकाना बेल्टनेने मारहाण केलीय.(Free style’ brawl between MP Dhairyasheel Mane driver and MLA’s son Rahul Prakash Awade driver)


पैसे नाहीत, वित्त विभागाच विरोध, योजना गुंडळणार? लाडक्या बहि‍णींना अजितदादांचा ‘वादा’

पंचगंगा नदीला पूर आल्याने कोल्हापूरमध्ये पूर आलाय. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली होती. त्यासाठी खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे हे आले होते. दोघांना सोडून ड्रायव्हर वाहने पार्किंग करत होते. त्याचवेळी दोघांचे वाहने एकमेंकाना घासल्याने वाद झाला. पण हा वाद विकोपाला गेला. दोघांनी एकमेंकाना अश्लिल शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर दोघेही हाणामारीवर आले. त्यानंतर दोघांना एकमेंकाना बेल्ट मारहाण केली. मारहाण करताना एकमेंकाचे कपडेही फाडले गेले.

Paris Olympics 2024 : मनू भाकरने केली कमाल, भारताला मिळणार ‘या’ इव्हेंटमध्ये पहिलं पदक

विशेष म्हणजे ही हाणामारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर सुरू होती. त्यावेळी मुश्रीफांच्या ड्रायव्हरने मध्यस्थी करून दोघांमध्ये हाणामारी थांबविली आहे. हा हाणामारीचा जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहेत. तर हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडे उशीरापर्यंत कुठलेही नोंद झालेली नाही.

follow us