Download App

शाहू महाराजांनी लोकसभेसाठी उभं राहू नये, नाहीतर पाडण्यासाठी जीवाचं रान करु : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif On Shahu Maharaj : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election)महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोल्हापुरातून (Kolhapur)श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati)यांनी उभं राहू नये. कोल्हापूरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif)यांनी सांगितले आहे.

Pooja Sawant : पूजा सावंतच्या हातावर सजली मेहंदी, फोटो व्हायरल

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, शाहु महाराज आमचे सर्वांचे आदर्श होते. पण त्यांनी राजकारणात यावं की नाही यावं, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते एक आदर्श व्यक्तिमत्व असल्यामुळे ते तसेच राहावं, अशी आमची इच्छा होती, मात्र आता लोक ठरवतील, असा खोचक टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. महाराष्ट्र इमारत व बांधकाम मंडळाच्यावतीने ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वाटपाला कोल्हापुरातून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, 17 वस्तूंचा समावेश असलेला संच बांधकाम कामगारांना दिला. बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेम योजना चांगली योजना होती. मात्र महात्मा फुले जन आरोग्य योजना, मेडिक्लेम योजना शासनाने बाजूला ठेवली आहे.

पूजा सावंतच्या शाही विवाहसोहळाचा थाट; अभिनेत्रीने शेअर केले खास क्षण, पाहा फोटो

कोल्हापूरच्या लोकसभा जागेचा निर्णय महायुतीतले तीनही पक्ष एकत्रित बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, त्या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते कार्यवाही करु, असेही यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापूरच्या जागेसंदर्भात जे काही ठरेल ते दोघांच्या (भाजप, शिवसेना) संमतीने ठरेल.

आपण महायुतीच्या घटक पक्षाचा मंत्री आहोत. कोल्हापूरच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करुन दोन्ही जागा निवडून आणाव्याचं लागणार असल्याचं यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी बोलून दाखवलं. सुळकुड योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही गटाकडील प्रतिनिधींची बैठक आहे. इचलकरंजीला शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची भूमिका आमची आहे.

कोल्हापूरमध्ये शंभर कोटी रस्त्यांचे काम सुरु आहे, अजून शंभर कोटी मागवले आहेत. कोल्हापूरचे रस्ते अगदी गुळगुळीत करु, त्यासाठी हाडांचे दवाखाने सुरु करण्याची गरज नाही, असेही यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज