Kolhapur Accident : राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur Accident) धक्कादायक बातमी आली आहे. देवगड-निपाणी राज्यमार्गावर ट्रक आणि बोलेरा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात तिघा युवकांचा जागीच मृ्त्यू झाला. अपघातातील मयत कोल्हापूर जिल्ह्यातील सोळंकूर या गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच गावातील तीन युवक ठार झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भीषण अपघात! तेल टँकर अन् ट्रकची धडक, अपघातात 48 जण ठार; तर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली
याबाबत आधिक माहिती अशी, निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरेवाडी-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलेरो गाडीची धडक झाली. या अपघातात जिल्ह्यातील सोळांकूर गावातील तीन युवक जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात शुभम चंद्रकांत घावरे (28), आकाश आनंदा परीट (23) आणि रोहन संभाजी लोहार (24) या तिघांचा मृत्यू झाला.
बुधवारी मध्यरात्री सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. बोलेरो जीपला ट्रकने जोराची धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी जोरदार होती की बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातावेळी ट्रक चालक भरधाव वेगात ट्रक चालवत असल्याची माहिती आता समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर त्याने कोणतीही मदत न करता तेथून पळून गेल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
मुंबईत भीषण अपघात! भरधाव वेगातील आलिशान कारने दोघा कार्यकर्त्यांना चिरडले
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.