Download App

Chhatrapati Shahu Maharaj Terminus : कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभर रद्द

कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर एक महिनाभरासाठी सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी (Chhatrapati Shahu Maharaj Terminus) रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसही (kolhapur tirupati haripriya express) आजपासून (दि. 5) आठ दिवस बेळगावमधून सुटणार आहेत. पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या एवढे दिवस बंद न ठेवता या गाड्या कोल्हापूर ते कराडपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांकडं केलीय.

कोल्हापूर-पुणे (Kolhapur to pune) व कोल्हापूर-सातारा (kolhapur to satara) या दोन्ही पॅसेंजर दि. 2 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्यात. पॅसेंजर रद्द झाल्यानं मिरजेहून कोल्हापूरकडं येणार्‍या प्रवाशांना पहाटेपासून साडेपाच ते सकाळी पावणे अकरापर्यंत एकही ट्रेन उपलब्ध नसणारंय.

यामुळं प्रवाशांना पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी येणारी महालक्ष्मी किंवा 10 वाजून 45 मिनिटांनी सुटणार्‍या महाराष्ट्र एक्स्प्रेसनं कोल्हापूरला यावं लागणारंय. दुहेरीकरणाच्या कामासाठी 2 मार्चपर्यंत कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आलीय. यापूर्वीच दि. 26 जानेवारीपासून बंद केलेल्या सातारा-पुणे व पुणे-सातारा पॅसेंजर दि. 2 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्यात.

अमृत भारत योजनेचा भाग म्हणून (Amrut Bharat Station Yojana) पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या यादीत कोल्हापूर, मिरज, सांगली आणि सातारा या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आलाय. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 2.41 लाख कोटी रुपयांची तरतूद केलीय. यामध्ये सुमारे 2 हजार 800 किलोमीटर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, विद्यमान रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे लाईन टाकणं यांचा समावेश आहे.

अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील 1 हजार 275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज स्थानक व फलाटांची सुधारणा, सर्व फलाटांची लांबी, रुंदी व उंची वाढविणे, पिट लाइनचे रखडलेले काम सुरू करणं, टाकणं आदी कामं करण्यात येणार आहेत.

कोण कोणत्या स्थानकांचा पुनर्विकास होणार
पुणे रेल्वे विभागांतर्गत मिरज, पुणे, कोल्हापूर, सातारा, चिंचवड, सांगली, कराड, हडपसर, बारामती, लोणंद, आकुर्डी, तळेगाव, हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरळी, केडगाव आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यात आलाय. या स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

Tags

follow us