Uday Samant On Uddhav Thackeray : वैयक्तिक टिकेला आम्ही आमच्या आयुष्यात कधीही किंमत दिलेली नाही. वैयक्तिक टीका करायची असेल तर आमच्या प्रत्येकाच्या मनात भरपूर काही भरलेलं आहे. मात्र आम्ही ते करत नाही. शिवाजी पार्कवर (Shivaji Park)सभा घेणारे आता रस्त्यावर सभा घेऊ लागले आहेत, अशी खोचक टीका उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर केली. ते कोल्हापूरमध्ये (Kolhapur)शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)महाअधिवेशनादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, शिवसेनेची शिवाजी पार्कवर सभा व्हायची पण आता त्यांना रस्त्यावर सभा घेण्याची वेळ आली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये चावडी सभा देखील झाली.
प्रफुल्ल पटेल तब्बल 483 कोटींचे मालक! देवरा, अशोक चव्हाणांचीही संपत्ती कोट्यावधींच्या घरात
सभेला लोकं जमली नाही म्हणून बाकीच्या खुर्च्या काढून टाकायच्या अन् बाकीच्या लोकांना बसायला द्यायच्या. अन् जाहीर सभेचं रुपांतर चावडी सभेत झालं. मोठ मोठ्या सभा घेणाऱ्यांना कॉर्नरला जाऊन आणि जावडीवर जाऊन सभा घ्यायला लागत आहेत.
माझी वैयक्तिक कितीही बदनामी केली तरी मला काही फरक पडत नाही. त्यांना जनता उत्तर देईल असेही मंत्री उदय सामंत म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले की, महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुका लढणार आहे. त्याचबरोबर त्यांनी 48 जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत मिशन 48 म्हणजेच सर्व 48 जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्यास लागणारे सर्व संसाधनांची व्यवस्था करण्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य नेते यांना देण्यात आले आहेत.
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेवर संशय घेणे म्हणजे मराठा समाजा आरक्षणाला विरोध करणं असाच अर्थ होत आहे. त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगावर संशय घेत असाल तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं नाही हे स्पष्ट होत आहे.
यावेळी बाळासाहेबांच्या साथीने ज्या लोकांनी शिवसेना वाढवली त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे पाच वार्षिक पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शिवसेना वर्धापन दिनी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यात उत्कृष्ट कामगार पुरस्कार हा शिवसेना नेते दत्ताजी साळवी यांच्या नावे तर नाविन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या नावे दिला जाणार आहे. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार हा शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांच्या नावे दिला जाणार आहे. तसेच कला क्षेत्र पुरस्कार हा दादा कोंडके यांच्या नावे देण्यात येणार आहे. आणि शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार हा शिवसेना नेते वामनराव महाडीक यांच्या नावे दिला जाणार आहे.