Download App

Loksabha Election 2024 : हातकणंगलेचा उमेदवार बदलणार? धैर्यशील मानेंनी सांगितली रिअल स्टोरी

Dhairyasheel Mane On BJP: लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024 )कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील बहुतेक जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यातच महायुतीकडून कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यातील हातकणंगले (Hatkanangle Lok Sabha)मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होत असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर या ठिकाणची उमेदवारी बदण्याच्या चर्चांनी जोर धरला. असं असलं तरी त्याबद्दल आज शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर या फक्त अफवा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

विखेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी मैदानात…मंत्री मुश्रीफांच्या उपस्थितीत गुरुवारी मेळावा

धैर्यशील माने म्हणाले की, उमेदवार बदलाच्या चर्चा या फक्त चर्चाच असतात. काही निर्णय घ्यायचा असेल तर पक्षनेतृत्व विचारपूर्वक निर्णय घेत असते. आज आपली उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या या चर्चा होत्या. अनेक लोक रिपोर्टींगच्या बद्दल चर्चा करत होते. काहीतरी बिनसलं असे म्हणत होते. राजकीय पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करुनच उमेदवारी देत असते. आणि आपल्याबद्दलचे रिपोर्ट हे सकारात्मक असल्यामुळेच आपल्याला उमेदवारी जाहीर केल्याचेही यावेळी खासदार माने यांनी सांगितले.

CM शिंदेना ठाण्यातच सापडेना उमेदवार… भाजपच्या गणेश नाईकांच्या हाती ‘धनुष्य-बाण’ देणार?

सामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील सकारात्मकता मला दिसते, मतदारसंघामध्ये कामाच्या माध्यमातून झालेली सकारात्मकता मला दिसते. आणि माझ्या मतदारसंघातली माणसं ही कामाला न्याय देणारी आहेत. आमच्या घराण्याची लोकसभेची वाट ही आजची नाही, तीन पिढ्यांपासून ग्रामपंचायतपासून तर आज थेट लोकसभेपर्यंत जाण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून आपण केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण ताकतीने जनता आपल्या पाठिमागे उभी राहिल, असा विश्वास यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे.

खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की, आपल्या उमेदवारीवरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजी नाही. आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इचलकरंजीमध्ये भाजप कार्यालयात बोलवून त्यांनी आपला जाहीर सत्कार केला. त्यामुळे महायुतीमध्ये कुठेही नाराजी नसल्याचे यावेळी खासदार माने यांनी सांगितले. त्यावेळी इचलकरंजी कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांशी भेटीगाठी झाल्या. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची टीम आमच्याबरोबर काम करत आहे.

महायुतीचा उमेदवार एकदा ठरला की, त्यावेळी दोन्ही पक्ष हातात हात घालून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतात. आपल्या मतदारसंघामधील भाजपची संपूर्ण टीम आत्तापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवत होते, पण आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते धैर्यशील माने आणि पंतप्रधान मोदींना ते घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम टीम म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

follow us

वेब स्टोरीज