Loksabha Election 2024 : मावळात पुन्हा बारणेंना संधी पण धनुष्यबाण पेलणार का?

Loksabha Election 2024 : मावळात पुन्हा बारणेंना संधी पण धनुष्यबाण पेलणार का?

विष्णू सानप, लेट्सअप मराठी

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला आहे. बारणे यांचा सामना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याशी होणार आहे.

Nilesh Lanke आज राजीनामा देणार? मतदारसंघातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार

बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. याआधी 2014 आणि 2019 ला त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र यावेळची निवडणूक जरा वेगळी आहे. शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे बारणे यांच्या समोरील प्रतिस्पर्धी यावेळी शिवसेनेचाच अर्थात उद्धव ठाकरेंचा असणार आहे. त्यामुळे आता होणारी ही लढत रंगतदार असणार आहे.

Israel Airstrike in Syria : इस्त्राईलचा सिरीयात हवाईहल्ला; 36 जवान मारले, भयावह व्हिडीओ समोर

याआधी बारणे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता. 2014 ला दिवंगत लक्ष्मण जगताप व 2019 ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी झाला होता. यामध्ये त्यांनी बाजी मारली होती. आता मात्र ज्या पक्षप्रमुखांच्या नेतृत्वात दोन निवडणुका लढले आणि जिंकले त्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात ही निवडणूक असल्याने धनुष्यबाण चिन्ह असूनही ते बारणेंना यावेळी पेलवणार का? हा मोठा प्रश्न आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची 7 दिवसांत इतकीच कमाई, बजेटचा आकडा आहे खूपच मोठा

याचं कारण असं की, 2009 ला हा मतदारसंघ तयार झाल्यानंतर आत्तापर्यंत शिवसेनेचाच खासदार मावळ लोकसभेतून निवडून गेला आहे 2009 ला स्व. गजानन बाबर येथून निवडून गेले होते. त्यानंतर बारणे यांनी सलग दोन वेळा येथून विजय मिळवला आहे. आता मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होऊन आश्चर्यकारक अशा युत्या आणि आघाड्या तयार झाल्या आहेत. यामुळे ही निवडणूक बारणे यांच्यासाठी अवघड पेपर झाला आहे.

Rameshwaram Cafe Blast चा आरोपी मुजम्मिल शरीफ एनआयएकडून ताब्यात; तीन राज्यांत 18 ठिकाणी छापे

दरम्यान, उद्धव ठाकरेंचा उमेदवार म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे हे मैदानात उतरले आहेत. वाघेरेंना पिंपरी-चिंचवड शहराची खडा न खडा माहिती आहे. सोबत एकसंघ राष्ट्रवादीचे त्यांनी सहा वर्ष शहराध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं आहे. शिवाय पिंपरी गावचे गाववाले असल्याने तो फायदा वेगळा. दुसरीकडे बारणे देखील पिंपरी चिंचवड मधील थेरगावचे भूमिपुत्र असल्याने या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

Cannes Film Festival मध्ये तीन मराठी चित्रपटांची निवड; ‘जिप्सी’,’भेरा’ अन् ‘वल्ली’ ची वर्णी

मावळ लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघ सोडला तर इतर पाचही विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना अर्थात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. सोबत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व शेकाप यांची साथ आहे. तर बारणे यांची जमेची बाजू म्हणजे भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत आहे.

Mukhtar Aansari died : कुख्यात गॅंगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू; जेलमध्येच आला ह्रदयविकाराचा झटका

मावळ लोकसभेवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दावा केला होता. मात्र आज महायुतीचा उमेदवार म्हणून बारणेंच्या नावाची घोषणा झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, दहा वर्षे खासदार म्हणून काम केलेले अनुभव बारणे यांच्या सोबत आहे. तर दुसरीकडे स्थानिक राजकारणामध्ये काम केलेले संजोग वाघेरे यांना सहानुभूतीचा फायदा होणार आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम केल्यामुळे जुन्या सहकाऱ्यांकडून मिळणारी मदत वेगळीच. या सर्व गोष्टी पाहता बारणेंची खासदारकीची हॅट्रिक पूर्ण करायची असल्यास बारणेंना ठाकरेंच्या मशालीला शमवावं तर वाघेरेंना निवडणुकीत नमवावं लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज