Loksabha Election 2024 : काँग्रेसकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर!

Loksabha Election 2024 : काँग्रेसकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर!

Congress Candiate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. उमेदवारांच्या सातव्या यादीनूसार काँग्रेसकडून तामिळनाडूमधील (Tamilnadu) मायीलाडूथूराय लोकसभा मतदारसंघात आर. सुधा तर छत्तीसगडच्या (Chattisgarth) चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित केली आहे. छत्तीसगडच्या कानकेर लोकसभा मतदारसंघात बिरेश ठाकूर तर बिलासपूरमध्ये देवेंद्र सिंग यादव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच रायगड लोकसभेतून मेनका देवी सिंग, तर सुरगूजामधून शशी सिंग यांना उमेदवारी देण्यात आलीयं.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राजस्थानसाठी चार आणि तामिळनाडूसाठी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसमंदमधून सुदर्शन रावत, भिलवाडामधून डॉ. दामोदर गुर्जर आणि कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने रविवारी (24 मार्च 2024) तीन उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीतील तिन्ही नावे राजस्थानमधील (चंद्रपूर, जयपूर आणि दौसा) होती. काँग्रेसने आपले घोषित उमेदवार सुनील शर्मा यांना हटवून माजी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांना जयपूरमधून उमेदवारी दिली आहे. नवोदित सुनील शर्माच्या वादानंतर हा निर्णय घेतला आहे. त्याआधी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली. यामध्ये 45 उमेदवार जाहीर करण्यात आले. काँग्रेसने राजस्थानमधील नागौर जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षासाठी सोडली होती. त्यापूर्वी 21 मार्चला काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती, त्यात 57 नावांचा समावेश होता. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची घोषणा केली आहे.

आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून शरद पवार गट आक्रमक; गद्दारीचा महामेरू म्हणत व्हिडीओ शेअर…

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने उदयपूरमधून राष्ट्रीय प्रवक्त्याला तिकीट दिले आहे. याशिवाय काँग्रेसने सिवानामधून मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत पक्षाने एकूण 151 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

धोलपूर जिल्ह्यातील भासेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने संजय कुमार जाटव यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार आणि एससी आयोगाचे अध्यक्ष खिलाडी लाल बैरवा यांचे तिकीट कट केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संजय जाटव यांना उमेदवारी दिली होती. आता पक्ष त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

यावेळी काँग्रेसने जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांची जागा बदलली आहे. बाडमेरच्या सिवाना मतदारसंघातून पक्षाने मानवेंद्र सिंह यांना तिकीट दिले आहे. गेल्या वेळी काँग्रेसने मानवेंद्र यांना झालावाडच्या झालरापाटन मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्या विरोधात उभे केले होते. यावेळी त्यांना शिवनामधून उमेदवारी देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube