PM Narendra Modi Criticized Sharad Pawar : मागील 15 वर्षांपूर्वी एक नेते येथे आले होते. येथील दुष्काळी भागात पोहोचविण्याची शपथ त्यांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं घेतली होती. पण, त्यांनी पोहोचवलं का असा सवाल उपस्थित करत त्यांना आता निवडणुकीत शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर (Sharad Pawar) घणाघाती टीका केली.
माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेत पीएम मोदींनी शरद पवार आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजित निंबाळकर, नीलम गोऱ्हे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आदींसह महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Modi Pune Speech : पुणे जिल्ह्यात NDA चौकार मारणार: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ग्वाही
मोदींनी नेहमीप्रमाणे भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पण यावेळी मोदींचा लूक काही वेगळाच होता. खांद्यावर घोंगडी आणि डोईवर पिवळा फेटा बांधत मोदी भाषणाला उभे राहिले. यावेळी त्यांनी सुरुवातीलाच लोकांची माफी मागितले. मोदी म्हणाले, आपल्या इथल्या राजकारणी लोकांना वेळेत यायची सवय नाही. सभा अकरा वाजताची असेल तर नेते थेट एक वाजता येतात. लोकांच्याही हे अंगवळणी पडलं आहे. पण, मी वेळेचा पक्का आहे. त्यामुळे मी आल्यानंतरही लोक येतच आहेत. आता मला उशिरा येणाऱ्यांचं दर्शन घेता येणार नाही. त्यांनाही माझे विचार ऐकता येणार नाहीत. त्यामुळे मी तुमची माफी मागतो.
दहा वर्ष रिमोट कंट्रोल सरकार होते. येथले मातब्बर नेते (शरद पवार) कृषीमंत्री होते . त्यावेळी उसाचा एफआरपी 200 रुपये होता. आज आमच्या सरकारच्या काळात 340 रुपये प्रति क्विंटल दर आहे. त्या काळात शेतकरी साखर कार्यालयात खेटा मारत होते. आज एरियल पेमेंट शंभर टक्के होत आहे. दिल्ली सरकारमध्ये ते होते. त्यावेळी फक्त साडेसात लाख कोटींचा शेतमालाची खरेदी केली होती. आज आम्ही मात्र 20 लाख कोटींच्या शेतमालाची खरेदी केल्याचे मोदी म्हणाले.
माढ्याचं पाणी, ऊसदर अन् 20 लाख कोटींची खरेदी; पवारांवर हल्लाबोल करत मोदींनी हिशोबच मांडला