Download App

“मोहिते पाटलांना तुतारी झेपणार नाही”, अजित पवार गटाच्या नेत्याचा खोचक टोला

Madha Lok Sabha Constituency : महविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात (Madha Lok Sabha) अजून उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात शरद पवार कुणाला (Sharad Patil) तिकीट देणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपला धक्का बसला. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी (Dhairyashil Mohite Patil) पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर मोहिते पाटील माढ्यात आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. त्यात आता अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

उमेश पाटील म्हणाले, मोहिते पाटील घराणं आता भूतकाळ झाला आहे. त्यांचं अस्तित्व फक्त माळशिरस तालुक्यापुरतं आहे. मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली काय आणि पिपाणी घेतली काय त्याने काहीच फरक पडणार नाही. मोहिते पाटील कुटुंबाला सत्तेचा मलिदा घ्यायचा होता. यासाठी भारतीय जनता पार्टीचा त्यांनी वापर करून घेतला. आता खासदाकीची स्वप्न त्यांना पडू लागली आहेत. परंतु, तुतारी त्यांना झेपणार नाही. तुतारी फुंकताना त्यांना लगेच दम लागेल अशी टीका उमेश पाटील यांनी केली.

माढ्यासाठी धैर्यशील मोहितेंची भाजपला सोडचिठ्ठी; राजीनामा बावनकुळेंनी केला कन्फर्म!

भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. माढ्यात धैर्यशील मोहिते पाटीलच उमेदवार असतील असं निश्चित आहे. आता फक्त त्यांची उमेदवारी घोषित होण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान, मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळाला असून तो आम्ही स्वीकारला आहे, अशी माहिती आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळालेला असून त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला आहे. मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही कुठेही कमी पडलो नाही. त्यांचा मान, प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला. ऐन निवडणुकीमध्ये त्यांनी असा राजीनामा देणं योग्य नव्हतं. मात्र त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे, असेही काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काल म्हणाले होते.

Madha Lok Sabha : माढा मतदारसंघात मोहिते-पाटलांचा डाव; रणजीत नाईक-निंबाळकरांची झोप उडणार! | LetsUpp

follow us

वेब स्टोरीज