Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील आंदोलन ते महाराष्ट्रभर दौरा केला. त्यात आता राज्याचा दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे हे ठिक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यात आज जरांगे यांनी राजगुरूनगरमध्ये भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र या सभेत एका तरूणाने गोंधळ घातल्याचं पाहायला मिळलं.
म्हणाला मला बोलू द्या नाहीतर…
जरांगेंच्या या सभेमध्ये त्यांच्या भाषणानंतर सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणसााठी टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेत या तरुणाने जीवन संपवलं. त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचवेळी एक तरूण व्यासपीठावर आला. त्याने अचानक गोंधळ घालायला सुरूवात केली. याचं झालं असं की, या तरूणाला काही तरू बोलायचं होतं. म्हणून तो वर आला होता.
सख्खा मित्र बनला पक्का स्पर्धक! शहराध्यक्ष पदानंतर आता बारामतीसाठीही साईनाथ बाबर इच्छुक
मात्र त्याने हातात माइक घेताचं तो आक्रोशाने बोलू लागला मात्र हा माइक बंद पडल्याने तो अधिक आक्रमक झाला. त्याने गोंधळ घालायला सुरूवात केली. यावेळी जरांगेंनी त्याची समजूत काढली. तसेच तेथील पोलीस आणि कार्यकर्त्यांनी त्याला व्यासपीठावरून खाली नेलं. शांत केलं. मात्र तो पुन्हा गोंधळ घालू लागला. त्याने यावेळी थेट धमकीच दिली.
Ajit Pawar : नावाजलेल्या वकीलांसह मार्ग काढणार, आरक्षणाचं अश्वासन देत अजितदादांची सावध भूमिका
हा तरूण गोंधळ घालताना तो मराठा आरक्षणासाठीच आक्रमक झाल्याचं कळालं. तो यावेळी म्हणाला की, मला बोलू द्या नाहीतर मी माझं जीवन संपवेन. जरांगेंनी पुन्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो समजण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलिस चौकीत दाखल केले.