सख्खा मित्र बनला पक्का स्पर्धक! शहराध्यक्ष पदानंतर आता बारामतीसाठीही साईनाथ बाबर इच्छुक

  • Written By: Published:
सख्खा मित्र बनला पक्का स्पर्धक! शहराध्यक्ष पदानंतर आता बारामतीसाठीही साईनाथ बाबर इच्छुक

पुणे : आगामी लोकसभेसाठी (Lok Sabha) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. मनसेने पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं. बारामती लोकसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन काल राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मनसेचे फायरब्रॅंड वसंत मोरे (Vasant More) यांनी पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यास पुणे लोकसभेवर मनसेचा झेंडा नक्कीच फडकवू, असा विश्वास व्यक्त केला. तर बाबर यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

Ajit Pawar : नावाजलेल्या वकीलांसह मार्ग काढणार, आरक्षणाचं अश्वासन देत अजितदादांची सावध भूमिका 

वसंत मोरे हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंशी जोडले गेले आहेत. अधूनमधून त्यांच्या पक्षाविरोधात नाराजीच्या बातम्या येत असतात. मोरेंनी राज ठाकरेंनी मशिदीच्या भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा विरोध केला होता. त्यानंतर मोरेंची शहर अध्यक्षपदावरून उचलबांगलीड करण्यात आली होती. ते पक्ष सोडणार असल्याचेही बोलले गेलं. मात्र वसंत मोरे यांनी आपण राज ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे सांगितलं होतं. मनसे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची क्रेझ आहे. त्यामुळे वसंत मोरेंनी अनेकादा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

वसंत मोरे यांचा 10 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने पुणे शहरात त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते. त्या बॅनरवर भावी खासदार… किंग ऑफ पुणे असं लिहिलं होतं. आता मोरेंनी पुन्हा एकदा पक्षाने संधी दिल्यास पुण्यातू मनसेचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.

साईनाथ बाबर यांनीही पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मनसे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पक्षाने संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक नक्कीच लढवणार आहे. मला माझी पुणे लोकसभा निवडणूक लढवायची आहे. साहेबांनी लढ म्हटल्यावर मी नक्की लढणार आहे.

दरम्यान, आता राज ठाकरे काय भूमिका घेतात. मोरेंना पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरवतात की बाबर यांनी तिकीट देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube