Download App

Shevgaon Riot : दंगलीनंतर शेवगावची झाली पोलीस छावणी

More than four hundred policemen deployed in Shevgaon : गेल्या काही दिवसांपूर्वी राम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर परवा अकोल्यातही दंगल (Riot) झाली. अकोल्यात उसळलेली दंगल थांबत नाही तोच काल अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात दोन गट एकमेकांना भिडले. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात पाच पोलीस (Police) जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

शेवगाव येथे कालछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शेवगाव शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दगडफेक झाली. यात अनेक जण जखमी झाले असून काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात 152 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी शेवगाव शहरात चारशेहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात दंगल नियंत्रण पथक दोन तुकड्या, एसआरपीएफच्या दोन तुकड्या, दोन उपअधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.

Raj Thackeray : …अन्यथा पराभव ‘अटळ’; अटलजींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत, राज ठाकरेंचा भाजपला सल्ला

प्राप्त माहितीनुसार, रविवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगावमध्ये मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5.30 च्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. यामध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. रात्री आठच्या सुमारास ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक एका गटाने मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक केली तर दुसऱ्या गटाने यापूर्वी आमच्या धार्मिक स्थळावर दगडफेक केल्याचा आरोप केला.

दरम्यान, यात जमावाने केलेल्या हल्यात तीन पोलिस कर्मचारी, चार होमगार्ड हे जखमी झाले आहेत. काही नागरिक जखमी झाले असून त्याची संख्या अजुन समजलेली नाही. शहरात शांतता आहे. पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला हे ही तळ ठोकून आहेत.

Tags

follow us