पोलिसांवर राजकीय दबाव; खासदार विखेंचे मोठे विधान

Sujay Vikhe On Police Department : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. पण नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे यांनी नगरच्या शांतता समितीच्या बैठकीत एक मोठे विधान केले आहे. पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप, दबाव आहे. तो काढून टाकला पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे विधान खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. हे विधान करताना त्यांनी आमदार, […]

Vikhe Patil Kardile

Vikhe Patil Kardile

Sujay Vikhe On Police Department : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. पण नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे यांनी नगरच्या शांतता समितीच्या बैठकीत एक मोठे विधान केले आहे. पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप, दबाव आहे. तो काढून टाकला पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे विधान खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. हे विधान करताना त्यांनी आमदार, खासदार, नगरसेवक हस्तक्षेप करत असल्याचे बोलले जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?

काही दिवसांपूर्वी नगरमधील काही भागात कायदा व सुव्यवस्था बिघडली होती. दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक झाली. त्याला खासदार सुजय विखे, आमदार उपस्थित होते. त्यावेळी विखे म्हणाले, जिल्ह्यात विविध सण उत्सव जयंती हे या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून तालुकाप्रमुखाला दमबाजी…

या काळात सामाजिक वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न काही दुष्ट प्रवृत्ती करतील. पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी. पोलिसांवर राजकीय दबाव नसावा. तो काढून टाकला पाहिजे. कार्यकर्त्याच्या एखाद्या कामासाठी फोन केला तर ठीक आहे. परंतु आमदार, खासदाराने पोलिसांवर दबाव टाकू नये. दंगलीसारख्या प्रकारात समाजकंटकावर कारवाई झाली पाहिजे. आमदार, खासदार, नगरसेवकांनी पोलिसांवर दबाव टाकू नये.

पोलिसांनी त्यांचे काम करावे कोणी तुमची बदली करणार नाही. ते डोक्यातून काढून टाकावे, असे विखे म्हणाले आहेत. राजकीय लोकांची दहशत नसावी, पोलिसांची दहशत राहिली पाहिजे, असे विखे म्हणाले.

Exit mobile version