शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून तालुकाप्रमुखाला दमबाजी…

शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून तालुकाप्रमुखाला दमबाजी…

अहमदनगर : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून पारनेरच्या तालुकाप्रमुखाला दमबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशीच मार्केड यार्ड परिसरात नगरसेवक अनिल शिंदे यांनी दमबाजी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दोन महिन्यात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लावणार, महसूलमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये

शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख विकास रोहकले यांना मार्केट यार्ड परिसरातं गाठून दमबाजी केली असल्याचं समजतंय. तक्रारीत म्हटले की, अनिल शिंदे यांनी तू परस्पर कामे कशी आणतो, या शब्दांत आपल्याला दम दिल्याचं विकास रोहोकले यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

अजितदांदांचे चंद्रकांतदादांना खोचक टोले, म्हणाले, दादा राजकारणात आल्यापासून..

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी पारनेर तालुकाप्रमुख विकास रोहकले यांना दमबाजी केली. या संदर्भात रोहकले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.

‘फडतूस’ ‘काडतूस’ च्या वादावर अजितदादांनी टोचले कान; म्हणाले, अशी वक्तव्ये..

अनिल शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात. ते अहमदनगर महापालिकेत नगरसेवकही आहेत.

Akash Thosar : वडिलांबरोबरचा ‘तो’ किस्सा सांगत आकाश ठोसर झाला भावुक

कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शिंदे यांनी तू परस्पर कामे कशी आणतो, असे म्हणत दमबाजी केल्याचा आरोप रोहकले यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube