‘फडतूस’ ‘काडतूस’ च्या वादावर अजितदादांनी टोचले कान; म्हणाले, अशी वक्तव्ये..

‘फडतूस’ ‘काडतूस’ च्या वादावर अजितदादांनी टोचले कान; म्हणाले, अशी वक्तव्ये..

Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या ‘फडतूस’ आणि ‘काडतूस’ शब्द चांगलेच गाजत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला, असे म्हटल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर फडणवीस यांनीही प्रत्युत्तर देत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले. त्यानंतर या शब्दांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आरोप-प्रत्यारोप तर अजूनही सुरुच आहेत. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी याच शब्दावरून राजकीय नेत्यांचे कान टोचले आहेत. अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत सरकारच्या कारभारावर टीका केली.

पवार म्हणाले, ‘राज्यकर्त्यांनी शोभतील अशीच वक्तव्ये करावीत. कुणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. मात्र सत्ताधारी किंवा विरोधक कुणीही अशी वक्तव्ये करू नयेत. उद्धव ठाकरेंनी कधीच हिंदुत्व सोडले नव्हते. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार आले होते. जनतेच्या हिताचे मुद्दे त्यात घेतले होते. तिनही पक्ष एकत्र आले की काय होते हे मधल्या काही निवडणुकांत दिसून आले असेलच. त्यामुळे ते त्यांचे राजकारण करत आहेत’, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

ट्विटरचा लोगो पुन्हा बदलला, श्वानाच्या जागी आता…

आवाज उठवला तर शिक्षा

राज्य सरकारविरोधात गाणे तयार करणाऱ्या एका युवकावर कारवाई करण्यात आली यावर विचारले असता ते म्हणाले, ‘सरकार त्यांचे आहे. त्यांच्याबाबत कुणी काही लिहीले बोलले तर त्यांना असेच शासन होणार. आम्ही आवाज उठवला तर तुम्हालाही शिक्षा. सरकारने आता हेच ठरवले आहे. त्यांना काही सांगायला गेले तर ते म्हणतात तुमच्याही काळात असेच सुरू होते. मात्र असे प्रकार घडू नयेत. मात्र ते आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांच्या पद्धती बदलल्या आहेत. हे दिसून येत आहे. जनता मात्र बारकाईने पाहत असते. लोक विचार करतील. मतदानाच्या वेळी उत्तर देतील.’

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

कोरोना गंभीर, मंत्रीच मास्क वापरत नाहीत

‘कोरोना परिस्थिती काय आहे याची नेमकी माहिती द्या असे आम्ही सांगितले होते. अधिवेशनात देखील मागणी केली होती. मात्र सरकारला अजूनही गांभीर्य दिसत नाही. मंत्रीच मास्क वापरात नाहीत. त्यामुळे जनतेला गांभीर्य राहत नाही. सरकारने कोरोना गांभीर्याने घ्यायला हवा. जनतेला दिलासा द्यावा. वस्तुस्थिती काय आहे हे सांगितले पाहिजे. सरकारने तातडीने लक्ष घालावे अशी आमची सूचना आहे.’

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube