सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?

सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?

कर्मचाऱ्यांच्या निवृतीच्या वयाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत असल्याची माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Hindenburg Case : शरद पवार उतरले अदानी यांच्या बचावासाठी! म्हणतात… जेपीसीची मागणी निरर्थक!

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाला आश्वासन दिल्याचं समजतंय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला राजपत्रित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Circuitt Review : काळजाचे ठोके चुकवणारा उत्तरार्ध, डगमगणारा पूर्वार्ध…

बैठकीत महसूल विभागीय संवर्ग वाटपाच्या अधिनियमातून पदोन्नत अधिकाऱ्यांना वगळणे, सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे 20 लाख करणे, 80 वर्षे वयावरील वरिष्ठ सेवानिवृत्तांना केंद्राप्रमाणे निवृत्तीवेतन वाढ देणे आदी मागण्यांबाबत चर्चा झाली आहे.

Unseasonal Rain : पुढील तीन-चार तासांत गारपीटीसह मुसळधार पाऊस…

बैठकीत ज्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली त्याबाबत शासनाने प्राधान्याने निर्णय घ्यावे, अशी भूमिका महासंघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलीय. दरवर्षी तीन टक्के कर्मचारी निवृत्त होत असतात. 16 लाख कर्मचाऱ्यांत दरवर्षी 48 हजार नोकऱ्या निर्माण होतात.

चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने खळबळ ! म्हणाले, अमोल कोल्हे भाजपात येणार असतील तर..

निवृत्तीचं वय दोन वर्षाने वाढवलं तर 96000 म्हणजे एक लाख नोकऱ्या निर्माण होतात, त्या तरुणांना मिळणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने निर्णय निवृत्तीचं वय 60 करण्याबाबतचं पत्र सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलं आहे.

दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भूषण गगराणी, दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube