श्रीगोंदा बाजार समितीत नागवडे-पाचपुतेंचे ‘गुळपीठ’

अहमदनगरः नगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यात अनेक बाजार समितीमध्ये वेगळीच राजकीय चित्र दिसून येत. त्यात श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून वेगळीच राजकीय गणिते समोर येत आहे. या ठिकाणी नव्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले राजेंद्र नागवडे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र येणार आहेत. दोघेही येत्या बुधवारी एकत्रित […]

Pachpute And Nagwade

Pachpute And Nagwade

अहमदनगरः नगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यात अनेक बाजार समितीमध्ये वेगळीच राजकीय चित्र दिसून येत. त्यात श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून वेगळीच राजकीय गणिते समोर येत आहे. या ठिकाणी नव्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले राजेंद्र नागवडे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र येणार आहेत. दोघेही येत्या बुधवारी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन एकत्र येण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

नेवासा बाजार समिती निवडणुकीने लक्ष वेधलं, गडाख-घुलेंविरोधात मुरकुटेंनी दंड थोपटले

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांच्यामध्ये खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एकमेंकाशी फाटले आहे. त्याचा फटका नागवडे यांना बसला आहे. त्यानंतर राहुल जगताप यांनी पक्ष विरहित समविचारी मित्रांना बरोबर घेऊन लढविणार निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. राहुल जगताप यांच्याबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे अण्णासाहेब शेलार, बबनराव पाचपुचे यांचे पुतणे साजन पाचपुते, बाळासाहेब नाहाटा हे एकत्रित आले आहेत.

भारतात इंधनाच्या किंमती वाढणार? कारण…

राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा यांच्यावर टीका केली. राहुल जगताप यांनी पोरकटपणा सोडावा, गेल्या दहा वर्षांपासून नागवडे यांना मदत करत असल्याचे नागवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राहुल जगताप यांच्या ताब्यात ही बाजार समिती आहे.

मलाही खालची भाषा येते पण… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी सुनावलं

ही बाजार समिती हिसकावून घेण्यासाठी राजेंद्र नागवडे आणि आमदार बबनराव पाचपुते यांनी कंबर कसली आहे. जगताप, नाहाटा, शेलार यांना धक्का देण्यासाठी नागवडे व पाचपुते हे एकत्र येत आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये काँग्रेस व भाजप नेते एकत्र येत आहे. या दोघांची आघाडी केवळ बाजार समिती पुरते मर्यादीत असल्याचे बोलले जात आहे. या राजकीय घडामोडीचा आगामी निवडणुकीच्या राजकारणातही परिणाम दिसून येत आहे.

Exit mobile version