Shirdi Temple: आमदार, खासदारांना दणका, ‘ही’ सुविधा बंद

अहमदनगर : साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba Darshan) जनसंपर्क कार्यालयातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘व्हीआयपी पास’ (VIP pass) दिला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपी नावाखाली गोरखधंदा केला जात आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी शिर्डी देवस्थानाने (Shirdi Temple) कठोर पावले उचलली आहेत. आमदार, खासदार, विश्वस्तांचे बोगस पीए आणि एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एण्ट्री’ करण्यात आलीय. देवस्थानाच्या निर्णयामुळे साईबाबांचे ‘व्हीआयपी दर्शन’ […]

Untitled Design

Untitled Design

अहमदनगर : साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba Darshan) जनसंपर्क कार्यालयातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘व्हीआयपी पास’ (VIP pass) दिला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपी नावाखाली गोरखधंदा केला जात आहे.

याचा बंदोबस्त करण्यासाठी शिर्डी देवस्थानाने (Shirdi Temple) कठोर पावले उचलली आहेत. आमदार, खासदार, विश्वस्तांचे बोगस पीए आणि एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एण्ट्री’ करण्यात आलीय.

देवस्थानाच्या निर्णयामुळे साईबाबांचे ‘व्हीआयपी दर्शन’ घडवून देणारे एजंट आणि बोगस पीएंना आता चाप बसणार आहे. साईदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ‘व्हीआयपी दर्शन’ घडवून देण्याच्या नावाखाली अनेक पीएंचे आर्थिक लागेबांधे असल्याचे निदर्शनास आल्याने साईबाबा संस्थानने कठोर निर्णय घेतला आहे.

आजी-माजी मंत्री, आमदार, विश्वस्तांना आता आपल्या पीएंच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र साई संस्थानला द्यावे लागणार आहे. शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त येत असतात. सामान्यांपासून नेते, अभिनेते, उच्चपदस्थ अधिकारी साईदरबारी हजेरी लावत असतात.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी साईबाबा संस्थान ‘व्हीआयपी दर्शन’ व्यवस्था करीत असते. यातूनच आता गोरखधंदा सुरू झाल्याचा प्रकार जिह्याचे प्रधान न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या लक्षात आला होता.

त्यानुसार त्यांनी संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवाय दोन दिवस अगोदर शिफारस करणाऱ्यालाच व्हीआयपी पास देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. त्यामुळे आर्थिक संबंधातून विकल्या जाणाऱ्या व्हीआयपी पासेसना पायबंद बसणार आहे.

साईमंदिर प्रशासनाने मंदिरात हार, फुले घेऊन जाण्यास बंदी घातलेली आहे. साईबाबा संस्थानने घेतलेल्या निर्णयाचे शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केले असून, त्याची कठोर अंमलबजावणी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Exit mobile version