Download App

साईबाबांच्या शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवास सुरुवात…

शिर्डीत साईबाबा संस्थानच्यावतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवास रविवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची मिरवणूक काढण्यात आली.

ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीलाही गळती! बड्या नेत्याची ‘देवगिरी’वर हजेरी…

आजच्याच दिवशी साईबाबांना गुरुस्थानी मानणारे भाविक शिर्डीत साई समाधीसमोर नतमस्तक होत आहेत. गुरुपोर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडायची, आता काय मिळालं?, आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं

आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी श्रींची पाद्यपुजा केली.

Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

तसेच रात्रीच्या सुमारास श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येणार असून हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे.

यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे व संस्थान संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी सहभाग घेतला. तसेच संस्थानचे मंदिरप्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us