गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडायची, आता काय मिळालं?, आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. राज्य सरकारच्या विरोधी बाकावर बसलेले नेते -राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उचललेल्या राजकीय पावलामुळे त्यांच्यावर आता जोरदार टीका होत आहे. अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) यावर प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Aditya Thackeray on eknath shinde ajit pawar slam bjp )
आदित्य ठाकरेंनी ट्विट करत लिहिलं की, आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही प्रश्न- मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनला आणखी एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत होती, त्यांना 1 वर्षानंतरही काय मिळाले? असा सवाल करत डिवचलं.
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 2, 2023
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय, असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्याचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
आज एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, “145 जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे, हे सिद्ध झालंय की, मिंधकडे क्षमताच नाही! ! नाहीतर इतके गद्दारांचं बहुमत असतांना आजचा कार्यक्रम कशाला?
अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होताच नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष…
आणि सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं?? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना! एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. दरम्यान, स्वार्थी विरुध्द स्वाभीमानी अश ही लढाई असणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांनी शुक्रवारीच राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.आणि आज त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची राज्यातील विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जारी केलेला व्हीप सर्वांना लागू होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.