अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होताच नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष…

अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होताच नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्ताधारी फडवणीस शिंदे गटाला जाऊन मिळाला असून या घडामोडीत महाराष्ट्राला पुन्हा एक नवीन उपमुख्यमंत्री मिळाला आहे. अचानक झालेल्या या सर्व राजकीय घडामोडींमुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

सर्व आमदार आमच्याशी बोललेत, त्यांना…; जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत मोठी माहिती

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप अजित पवार गटासोबत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल फटाके फोडून पेढे वाटत जल्लोष साजरा केला आहे. उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अजित पवार विराजमान झाल्यामुळे राज्यातील तसेच अहमदनगर शहरातील विकास कामे पुन्हा एकदा जलद गतीने सुरू होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे.

अशोक चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना फोन, अजितदादांनाही भेटले; उघड केलं मोठं सत्य

यावेळी बोलताना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले, आज जो मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला असून यामध्ये उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून आणि पेढे भरून जल्लोष साजरा केला आहे.

Maharashtra Politics : ज्यांना कंटाळून शिंदे गट फुटला; त्याच अजितदादांसाठी घातल्या पायघड्या!

तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप देखील त्यांच्याबरोबर असून कार्यकर्त्यांचा पक्ष फक्त आमदार संग्राम जगताप आहे आणि त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहणार आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहणार असून त्याचप्रमाणे आमदार संग्राम जगताप यांच्यामार्फत देखील शहरात विकासाची गंगा वाहणार असल्याची भावना बनसोडे यांनी व्यक्त केली.

यावेळी सुरेश बनसोडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, पप्पु पाटील, अमोल जाधव, वैभव साळुंके, सचिन कसबे, राहुल सोनटक्के, अक्षय बोरूडे, धम्मा गायकवाड, तेजस गायकवाड आधी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube