ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीलाही गळती! बड्या नेत्याची ‘देवगिरी’वर हजेरी…
सत्तासंघर्षानंतर आधी ठाकरे गटाच्या गळतीला सुरुवात झाली होती, अगदी तशीच गळती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सुरु झालीय. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे बडे नेते ‘देवगिरी’ बंगल्यावर अजित पवारांच्या भेटील जात असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद परांजपे अजित पवारांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर अजित पवारांनी आमदारांसमवेत थेट राजभवनात दाखल झाले होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तत्काळ जयंत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती. आव्हाडांची नियुक्ती होताच परांजपेंनी आपली पवार गटाला पसंती दिलीय. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडल्याचं दिसून येत आहे.
अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलांचा पाठिंबा
अजित पवारांच्या बंडानंतर आक्रमक भूमिका घेत शरद पवारांनी जे घडलं त्याचं मला काही नाही, आज जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानूसार शरद पवार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यास रवाना झाले आहेत. समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर पवारांची जाहीर सभा होणार आहे.
SAFF Championship : भारताचा रोमहर्षक सामन्यात शानदार विजय; टीम इंडियाचं चॅम्पियनशिपचं लक्ष्य
तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ज्या आमदारांनी अजित पवारांसोबत शपथ घेतलीय. त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचा करण्याचा निर्णय घेत विधानसभा अध्यक्षांना कारवाईचं पत्र पाठवलयं.
दरम्यान, एकंदरीत राज्याच्या राजकारणात आता ठाकरे गटानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही गळती सुरु झाल्याची चर्चा रंगली असून पुढील काळात किती नेते अजित पवारांच्या गटात सामिल होतील? की ते नेते शरद पवारांसोबतच एकनिष्ठ राहतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.