Jayant Patil : बंडानंतर जयंत पाटील अॅक्शन मोडमध्ये! अजित पवारांसह ‘त्या’ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई…
Jayant Patil : राज्याच्या राजकारणात महाभूकंपानंतर आता बंडखोर आमदारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाऊल उचलण्यास सुरुवात झालीय. अजित पवार यांच्यासमवेत ज्या आमदारांनी शपथ घेतलीय त्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. काल रात्री उशिराने पत्रकार परिषद घेत जयंत पाटलांना याबाबत माहिती दिलीय.
यावेळी जयंत पाटलांनी अजित पवारांच्या शपथविधीवर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडताना म्हणाले, राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी पक्षाच्या धोरणआविरोधात जात राजभवनात शपथ घेतली आहे. ही कृती बेकायदेशीर असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना अंधारात ठेऊन त्यांनी केलेली कृती बेकायदेशीर असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होताच नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष…
तसेच शपथ घेतलेल्या आमदारांना अपात्र करण्याबाबत कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडे व्हॉट्अप आणि इमेलद्वारे आम्ही पाठवले आहे. विधानसभा अध्यक्ष लवकरच प्रतिसाद देतील अशी अपेक्षा असून निवडणुक आयोगालाही आम्ही घटनेची माहिती दिल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलांचा पाठिंबा
जयंत पाटील म्हणाले, आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ जण म्हणजे पक्ष नव्हे. त्यामुळे या नऊ जणांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षविरोधात कारवाई केल्याने या नऊ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. जनमत हे पवार साहेबांच्या सोबत आहे.
Elon Musk यांनी काढला नवा फतवा; आता twitter वर दिसणार केवळ ‘एवढ्याचं’ पोस्ट
येत्या 5 जुलै रोजी शरद पवारांच्या पाठीमागे महाराष्ट्र कसा उभा राहतो ते देखील पाहा असंही पाटील म्हणाले. यातील अनेक आमदार हे परत येणार आहेत. त्यांना आपल्या मतदारांना तोंड कसं दाखवायचं असा प्रश्न पडला आहे. त्यांना या गोष्टीही माहिती नव्हत्या. जे परत येतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, पण जे परत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसमवेत राजभवनात घेतलेल्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे पक्षाचा प्रतोद जितेंद्र आव्हाडच, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.