Sangamner Stone Pelting : संगमनेरमधील समनापूर (Samnapur) येथे मोर्चा संपल्यानंतर दगडफेक झाली होती. त्यात दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सतरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण हे संगमनेर व राहाता तालुक्यातील आहेत. (sangamner-stone-pelting-police-arrest-17-suspect)
संगमनेरमध्ये मंगळवारी भगवा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा संपल्यानंतर परत जाणारे मोर्चेकरी व काही तरुणांमध्ये समनापूर येथे वाद झाला. त्यानंतर जोरदार दगडफेक झाली. या दगडफेकीत परिसरातील वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे समनापूर येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला आहे. या दगडफेकीत दोन वृद्ध व्यक्ती हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एका जणाला उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.
Ahmednagar News : तणावाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; असे असणार नियम…
याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा जखमी इस्माईल फकीर मोहंमद शेख यांच्या फिर्यादीवरून वीस ते पंचवीस जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर पोलिसांनी रात्री आरोपींची शोध सुरू केला आहे.
Kolhapur : दगडफेकीमागे कोण? सूत्रधार शोधून काढा; अनिल परब सरकारवर भडकले
रात्रीतून सत्यम भाऊसाहेब थोरात, सुनील बाबासाहेब थोरात, ललीत अनिल थोरात, प्रमोद संजय थोरात, दत्तात्रय संपत थोरात, आबासाहेब शिवराम थोरात यांना वडगाव पान येथून ताब्यात घेऊन अटक केली. अवीराज आनंदा जोंधळे , विकास अण्णासाहेब जोंधळे. भाऊसाहेब यादव जोंधळे (रा.कोकणगाव), कुणाल ईश्वर काळे , करण ज्ञानेश्वर काळे, (रा. माळेगाव हवेली), वैभव रंगनाथ शिंदे (रा.मनोली), शुभम बाळासाहेब कडू ऋषीकेश शरद घोलप, तनोज शरद कडू व महेश विजय कडू (रा.पाथरे, ता.राहाता) अशा सतरा जणांना अटक केली.
या आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.