Kolhapur : दगडफेकीमागे कोण? सूत्रधार शोधून काढा; अनिल परब सरकारवर भडकले
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकारावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठविली. आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर टीका करत यामागे कोण सूत्रधार आहेत ते शोधण्याची मागणी केली आहे.
परब यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. परब म्हणाले, कोल्हापूरमधील दगडफेकीमागील सूत्रधार कोण आहेत ते शोधले पाहिजेत. जाणूनबुजून असं केलं जातंय का तेही शोधले पाहिजे. कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का त्याचाही खुलासा झाला पाहिजे. पोलिसांनी आपलं काम चोख केलं पाहिजे. कोणत्याही दबावाखाली याची चौकशी होऊ नये.
Ajit Pawar : औरंगजेबाचं समर्थन कुणी का अन् कसं करेल? राज्यातील घटनांवर अजित पवार संतापले
ते पुढे म्हणाले, जर अशा पद्धतीने राज्यात अशांतता होत असेल तर कोणता गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करायला तयार होईल. आमच्याकडे पोलिसांकडून अपेक्षा करणे हाच एक मार्ग शिल्लक आहे. योग्य प्रकारे तपास करण ही पोलिसांची जबाबदारी आहे. या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परब यांनी केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गृहमंत्रालयाचे नाव खराब होत आहे. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी घडली असेल तर परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट घडवून आणायची आणि त्यातून सामाजिक धार्मिक सलोखा बिघडवायचा हे राज्याला परवडणारे नाही, असे परब म्हणाले.
हे तर गृहमंत्रालयाचे अपयश – सुळे
दरम्यान, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल नगरची घटना झाली आज कोल्हापुरात होतंय. जेव्हापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखंच असं वातावरण दुषित कसं होत आहे. काल नगरची घटना झाली आता कोल्हापुरला होतंय. राज्यात सातत्याने तणावाचं वातावरण कसं होतं. या अशाच गोष्टी जर होत राहिल्या तर त्यात राज्याचं नुकसान होणार आहे. लोकं गुंतवणूक करणार नाहीत. सर्वसामान्य जनताही सध्या घाबरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.