Download App

Sangli Loksabha : पैलवान, काका, अन् विशाल पाटील..; सांगलीचा आखाडा कोण मारणार?

सांगली लोकसभा निवडणुकीत यंदाही तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे सांगलीचा आखाडा नेमका कोण मारणार? हे येत्या 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.

Sangli Loksabha : संसांगली मतदारसंघ अनेक राजकीय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. त्याचं कारण म्हणजे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी. महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमदेवारी देण्यात आली होती. काँग्रेसने या जागेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण उद्धव ठाकरे बधले नाहीत. त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली. तर भाजपने संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा संधी दिली. मतदानानंतर या तिन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले होते. पणआता निकालाला अवघे काही दिवस बाकी असतानाच पुन्हा एकदा सांगलीचा आखाडा नेमका कोण मारणार? याबाबत चर्चा होत आहेत.

Video : न्यायालयात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाईफेक; वंदे मातरम् संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात

सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये सांगली, मिरज,पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जतचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघात एकूण 58 टक्के मतदान झालं. यात मिरजमध्ये 59 टक्के, सांगलीमध्ये 57.50, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये 61.16 तर जतमध्ये 59.32, खानापूरमध्ये 51.11 आणि पलूस-कडेगाव 56.45 टक्के मतदान झालं.

संजयकाकांचे मित्र झाले विरोधक :

मागील दोन टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील यांचे दहा वर्षांच्या काळात विविध तालुक्यातील समर्थक यंदाच्या निवडणुकीत विरोधक झाले. जतचे माजी आमदार विलासराव जगताप, तर पलूस-कडेगावमध्ये देशमुख यांच्यासोबत त्यांचं बिनसलं. या तालुक्यांमध्ये जगताप आणि देशमुख घराण्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे दोन तालुक्यातून संजयकाकांना फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय कवठे महाकाळमधूनही अजितराव घोरपडे यांनी संजयकाकांविरोधात भूमिका घेतली. त्यांनी उघडपणे विशाल पाटील यांचा प्रचार केला.

योगी आदित्यनाथ यांची सभा :

सलग तिसऱ्यांना बाजी मारण्यासाठी संजय काका पाटलांनी चांगलीच रणनीती आखल्याचं दिसून आलं. सांगली-मिरज भागातून हिंदुत्वाचा ज्वर तयार करण्यासाठी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन केलं होतं. एकीकडे धार्मिक ध्रुवीकरणामुळे विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची मते विखुरले जातील आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते पदरात पाडून घेण्याची रणनीती संजय काका पाटलांनी आखली होती.

‘या’ 7 शेअर्सनी गुंतवणुकदारांना केलं मालामाल; फक्त 5 महिन्यातच 354 टक्क्यांचा परतावा

मुस्लिम आणि दलित मते कोण घेणार?

सांगली-मिरज भागात मुस्लिम मतदान मोठ्या संख्येने आहे. याशिवाय जिल्ह्यात दलित मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ही मते यंदा विशाल पाटलांनी आपल्याकडे ओढली असल्याचे सांगितले जाते. मात्र विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यामध्ये या मतांचे ध्रुवीकरण झाले असल्यास त्याचा फायदा संजयकाकांना होऊ शकतो असा अंदाज आहे.

चंद्रहार पाटील तुल्यबळात कमी :

सांगली मतदारसंघात काँग्रेसला आणि वसंतदादा पाटील घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. दादा घराण्याविषयी नेहमीच आदर राहिला आहे. पण याच वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारली गेली. चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केल्याने वसंतदादा गटाकडून संतापाची लाट उसळली. चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचे मैदान गाजवले असले तरीही ते राजकीय मैदानात फाईट देऊ शकणार नाहीत, असे अनेक नेत्यांचे म्हणणे होते.

 

उमेदवारी नाकारल्याने ‘काँग्रेस’ एकवटली…

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. आणीबाणीतही इथून काँग्रेसचाच खासदार निवडून आला होता. पण 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपने सर केलेला हा किल्ला पुन्हा मिळवायचाच हाच उद्देश काँग्रेसने डोळ्यासमोर ठेवला होता. त्यासाठी विशाल पाटील या एकमेव उमेदवाराचे नाव दिल्लीला पाठविण्यात आले होते. मात्र अचानकपणे उमेदवारी डावलल्याने संतापाची लाट उसळून आली.

वसंतदादा घराण्याचा, काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाल्याने सांगलीतील मदन पाटील गट, विशाल पाटील, प्रतिक पाटील, विश्वजीत कदम गट एकत्र आल्याचं दिसून आलं. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून विशाल पाटील यांना साथ दिल्याचे दिसून आले. याशिवाय पृथ्वीराज पाटील यांनीही विशाल यांनाच साथ दिल्याचे बोलले जाते.

तासगांवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तरुण नेते रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनीही संजयकाका नकोच या भूमिकेतून विशाल पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. जत तालुक्यातील धनगर नेत्यांनीही विशाल पाटलांना पाठिंबा दिल्याने त्यांना धनगर मतांचा मोठा फायदा होणार आहे. यासोबतच संरपंचांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वांनीच विशाल पाटलांनाच पसंत दिली असल्याचं चित्र दिसून येत आहे.

follow us

वेब स्टोरीज